सलीम खान यांची प्रकृती आता कशी आहे? आमिर खानने दिली महत्वाची अपडेट, म्हणाला- "आम्ही प्रार्थना करतोय की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 09:35 IST2026-02-26T09:33:17+5:302026-02-26T09:35:45+5:30

बॉलिवूडचे ज्येष्ठ पटकथा लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार रुग्णालयात हजेरी लावत आहेत.

How is Salim Khan health now Aamir Khan gave an important update | सलीम खान यांची प्रकृती आता कशी आहे? आमिर खानने दिली महत्वाची अपडेट, म्हणाला- "आम्ही प्रार्थना करतोय की..."

सलीम खान यांची प्रकृती आता कशी आहे? आमिर खानने दिली महत्वाची अपडेट, म्हणाला- "आम्ही प्रार्थना करतोय की..."

बॉलिवूडचे ज्येष्ठ पटकथा लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार रुग्णालयात हजेरी लावत आहेत. अभिनेता आमिर खानने देखील नुकतीच रुग्णालयात जाऊन सलीम खान यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांना माहिती दिली.

आमिर खानची प्रतिक्रिया

सलीम खान यांची भेट घेण्यासाठी आमिर खान दुसऱ्यांदा रुग्णालयात पोहोचला होता. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना तो म्हणाला, "मी सलीम साहेबांना भेटायला गेलो होतो. आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत की ते लवकरात लवकर बरे होऊन घरी परत यावेत. ते सध्या आयसीयूमध्ये (ICU) असल्याने मी त्यांना वैयक्तिकरित्या भेटू शकलो नाही, पण मी त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवला."

सलीम खान यांच्या मुलीने म्हणजेच अलविरा अग्निहोत्रीने आमिरला त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. आमिरने सांगितले की, "अलविराजींनी मला सांगितले की त्यांच्या प्रकृतीत दररोज सुधारणा होत आहे. ही आमच्यासाठी दिलासादायक बाब आहे. ते पुन्हा एकदा पूर्णपणे फिट होऊन घरी यावेत, हीच आमची इच्छा आहे."

काय घडलं होतं?

९० वर्षीय सलीम खान यांना १७ फेब्रुवारी रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांना खबरदारी म्हणून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ (Brain Clot) असल्याचे समोर आले होते, ज्यावर आता डॉक्टरांद्वारे उपचार सुरू आहेत. सलीम खान यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आमिर खान व्यतिरिक्त जावेद अख्तर, संजय दत्त, आणि शिल्पा शेट्टी यांसारख्या अनेक कलाकारांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. 

Web Title : सलीम खान का स्वास्थ्य अपडेट: आमिर खान ने दी महत्वपूर्ण खबर

Web Summary : आमिर खान ने अस्पताल में सलीम खान से मुलाकात की और कहा कि वह उनके शीघ्र स्वस्थ होने की प्रार्थना कर रहे हैं। सलीम खान आईसीयू में हैं, लेकिन उनकी बेटी ने बताया कि उनमें प्रतिदिन सुधार हो रहा है। कई बॉलीवुड सितारों ने समर्थन देने के लिए दौरा किया।

Web Title : Salim Khan's Health Update: Aamir Khan Shares Important News

Web Summary : Aamir Khan visited Salim Khan in the hospital, saying he's praying for his speedy recovery. Salim Khan is in the ICU, but his daughter reported daily improvements. Many Bollywood stars have visited to offer support.