अक्षय कुमारला कसा वाटला 'बागी ४'?; म्हणाला- 'संजूबाबा आणि टायगर श्रॉफने...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:37 IST2025-09-05T13:36:44+5:302025-09-05T13:37:09+5:30
अक्षय कुमारने 'बागी ४' सिनेमा पाहून त्याच्या भावना स्पष्ट शब्दांमध्ये व्यक्त केला आहे

अक्षय कुमारला कसा वाटला 'बागी ४'?; म्हणाला- 'संजूबाबा आणि टायगर श्रॉफने...'
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमीच बॉलिवूडमधील विविध सिनेमांचं कौतुक करताना दिसतो. अक्षयने नुकतंच टायगर श्रॉफ आणि संजय दत्त यांच्या आगामी 'बागी ४' या चित्रपटाबद्दल खास पोस्ट लिहिली आहे. अक्षयने चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे मत व्यक्त केले. अक्षय कुमारने आपल्या पोस्टमध्ये 'बागी ४' विषयी मोजक्या शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
अक्षय कुमारने 'बागी ४' च्या ॲक्शन दृश्यांची खूप प्रशंसा केली. अक्षयने 'बागी ४' चित्रपटाला 'फुल ऑन ॲक्शन हंगामा' असं म्हटलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफ आणि संजय दत्त यांचे जबरदस्त ॲक्शन स्टंट्स आणि फायटिंग सीन्स दाखवण्यात आले आहेत, जे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अक्षयने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत लिहिले की, "टायगर श्रॉफ आणि संजू बाबाला 'बागी ४'मध्ये पाहणे खूप आनंददायी आहे. फुल ऑन ॲक्शन हंगामा! संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा." अशा शब्दात अक्षयने 'बागी ४'चं कौतुक केलं आहे.
'बागी ४' हा चित्रपट त्याच्या ॲक्शन-पॅक कथानकासाठी ओळखला जातो. यापूर्वीचे 'बागी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरले आहेत. टायगर श्रॉफ त्याच्या ॲक्शन कौशल्यांसाठी प्रसिद्ध आहे, तर संजय दत्तचा समावेश या चित्रपटात आणखी रोमांच वाढवत आहे. 'बागी ४' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, अक्षय कुमारसारख्या मोठ्या कलाकाराने केलेल्या कौतुकामुळे या चित्रपटाबद्दलची चर्चा अधिक वाढली आहे. 'बागी ४'मध्ये टायगर आणि संजय दत्तसोबत हरनाज सिंधू, सोनम बाजवा हे कलाकारही झळकत आहेत.