Housefull 5 Review : 'हाऊसफुल ५' पाहावा की नाही? प्रेक्षकांना नक्की कसा वाटला चित्रपट? वाचा ट्विटर रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:21 IST2025-06-06T14:21:41+5:302025-06-06T14:21:55+5:30

Housefull 5 Review : 'हाऊसफुल ५' प्रेक्षकांना आवडलाय की नाही? जाणून घ्या

Housefull 5 Twitter Review Akshay Kumar's Murder Mystery Comedy Gets Mixed Reactions Netizens Say | Housefull 5 Review : 'हाऊसफुल ५' पाहावा की नाही? प्रेक्षकांना नक्की कसा वाटला चित्रपट? वाचा ट्विटर रिव्ह्यू

Housefull 5 Review : 'हाऊसफुल ५' पाहावा की नाही? प्रेक्षकांना नक्की कसा वाटला चित्रपट? वाचा ट्विटर रिव्ह्यू

Housefull 5 X Review: अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'हाऊसफुल ५'ची सध्या चर्चा सुरु आहे. चित्रपटाचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे, दोन क्लायमॅक्स.  'हाऊसफुल ५' चित्रपटाचे दोन वेगवेगळे शेवट आहेत. याचा अर्थ असा की प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट दोनदा पाहावा लागेल, जेणेकरून ते दोन्ही क्लायमॅक्स पाहू शकतील. आज ६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये 'हाऊसफुल ५' प्रदर्शित झाला आहे. खरं तरं या चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंगदरम्यान तब्बल ४५ हजार तिकिटे विकली गेली होती. त्यामुळे या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभणार हे निश्चित होत. मात्र हा चित्रपट पाहिल्यानंतर तो चाहत्यांना कसा वाटला, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. चला पाहूया 'हाऊसफुल ५' प्रेक्षकांना आवडलाय की नाही.

'हाऊसफुल ५' पाहिल्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. ट्विटरवर ट्वीट करत नेटकऱ्यांनी हा चित्रपट नेमका कसा आहे, हे सांगितलं आहे. या चित्रपटावर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींना मध्यांतरापूर्वीचा भाग खूप आवडला तर इंटरवलनंतर चित्रपट कंटाळवाणा असल्याचं  म्हटलंय.

चित्रपट पाहिल्यानंतर एका युजरनं ट्विट करत लिहलं, "हा चित्रपट एक संपूर्ण मनोरंजनाचा धमाका आहे. अक्षय कुमारची कॉमिक टायमिंग अद्भुत आहे. तो प्रत्येक दृश्यावर वर्चस्व गाजवतोय. संपूर्ण कलाकारांनी उत्तम काम केलं आहे आणि सर्वांमधील केमिस्ट्री मजेदार आहे. गाणी देखील भारी आहेत आणि चित्रपटाशी जुळतात". 

तर आणखी एकानं लिहलं, "चित्रपटाची सुरुवात चांगली होते आणि त्यानी मनोरंजन होणार असा शब्द दिला होता, चित्रपट अगदी तसाच आहे. दुसऱ्या भागात थोडी अधिक गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, पण तरीही तो पाहायला मजा येते. शेवटी प्रेक्षकांचं मनोरंजन होतं, आणि तेच महत्त्वाचं आहे. संपूर्ण स्टार कास्ट मजबूत आहे आणि सर्वांनी उत्तम काम केलं आहे. अक्षय कुमारची कॉमिक टायमिंग कंटाळवाण्या क्षणांनाही मजेदार बनवते. रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन देखील नेहमीप्रमाणे उत्कृष्ट आहेत. महिला कलाकारांनी देखील चांगलं काम केलं आहे".

 

एका युजरनं लिहलं, "तरुण मंसुखानीनं 'हाऊसफुल' फ्रँचाईझीला एक वेगळं वळण दिलंय. अक्षय कुमार सहजतेनं स्क्रीनवर अधिराज्य गाजवतोय आणि त्याला रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि नाना पाटेकर यांचा दमदार साथ लाभली आहे. संपूर्ण कलाकारांची केमिस्ट्री विशेषतः उठून दिसते आहे. खरा 'बॉलीवूड मसाला' असं काही असेल, तर तो हाच! या शैलीचे चाहते असाल, तर हा चित्रपट नक्कीच बघावा!". यासोबतच एका युजरनं सांगितलं की त्यानं H5A पाहिला आणि तो खूप आवडला. आता भाग B ची वाट पाहत आहे. तर काहींनी चित्रपट आवडला नसल्याचंही म्हटलं. 

 

 

Web Title: Housefull 5 Twitter Review Akshay Kumar's Murder Mystery Comedy Gets Mixed Reactions Netizens Say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.