कॉमेडी अन् सस्पेन्सचा तडका; 'हाऊसफुल-५' चा जबरदस्त टीझर रिलीज, अक्षय-रितेशसोबत नाना पाटेकरांचा मजेदार अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:54 IST2025-04-30T12:51:40+5:302025-04-30T12:54:05+5:30

नाना पाटेकर, अक्षय कुमार, रितेशचा मजेशीर अंदाज; बहुचर्चित 'हाऊसफुल-५' चा धमाकेदार टीझर रिलीज

housefull 5 teaser released starrer akshay kumar riteish deshmukh nana patekar and abhishek bachchan | कॉमेडी अन् सस्पेन्सचा तडका; 'हाऊसफुल-५' चा जबरदस्त टीझर रिलीज, अक्षय-रितेशसोबत नाना पाटेकरांचा मजेदार अंदाज

कॉमेडी अन् सस्पेन्सचा तडका; 'हाऊसफुल-५' चा जबरदस्त टीझर रिलीज, अक्षय-रितेशसोबत नाना पाटेकरांचा मजेदार अंदाज

Housefull 5 Teaser:बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी 'हाऊसफुल' फ्रॅंचायझीचा पाचवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील काही दिवसांपासून या चित्रपटासंदर्भात बॉलिवूड इंडस्ट्रीत जोरदार चर्चा सुरु होती. अशातच नुकताच 'हाऊसफुल्ल-५' चा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहे. 'हाऊसफुल्ल-५'  चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण मानसुखानी यांनी केलं आहे. नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली याची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या ६ जूनला हा बहुचर्चित चित्रपट सर्वत्र रिलीज करण्यात येणार आहे. 


नुकताच 'नाडियाडवाला ग्रॅंडसन्स' च्या सोशल मीडिया अकाउंटवर 'हाऊसफुल्ल- ५' सिनेमाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रितेश देशमुखसह १८ दमदार कलाकारांची फौज आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात केवळ कॉमेडीच नाहीतर एका खुनाचा गूढ थरार पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. पण, आता हाऊसफुल्ल-५ च्या जबरदस्त टीझरमुळे प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

या टीझरमध्ये अभिनेता अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख विनोदी शैलीत दिसत आहेत. याशिवाय संजय दत्त, फरदीन खान, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, डिनो मोरिया, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, निकितिन धीर, रणजीत, आकाशदीप साबीर, जॅकलीन फर्नांडीज, नर्गिस फाकरी, चित्रांगदा सिंह आणि एस. शर्मा यांच्यासारख्या कलाकारांची झलक देखील पाहायला मिळतेय. कॉमेडी आणि सस्पेन्सने परिपूर्ण असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. 'हाऊसफुल ५' ची कथानक एका क्रूझ जहाजावर आधारित आहे, ज्यामधील हत्येचे रहस्य देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे. 

Web Title: housefull 5 teaser released starrer akshay kumar riteish deshmukh nana patekar and abhishek bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.