केसात गजरा, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर... मलायकाचा पारंपरिक साज (Video)

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 20:28 IST2023-10-27T20:27:16+5:302023-10-27T20:28:22+5:30

मलायका नेहमी वेस्टर्न पोशाखात दिसते, त्यामुळे तिचा नवा लूक चर्चेत आहे

Hot Bollywood Actress Malaika Arora look stunning in traditional Marathi outfit | केसात गजरा, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर... मलायकाचा पारंपरिक साज (Video)

केसात गजरा, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर... मलायकाचा पारंपरिक साज (Video)

Malaika Arora Traditional Look Video: बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध आयटम साँग गर्ल मलायका अरोराच्या सौंदर्य आणि फिटनेसची चर्चा दूरवर असते. खासकरून तिची बोल्ड स्टाइल मनाला कायमच भावते. यावेळी पारंपरिक स्टाईलमध्ये वेशभूषा केलेल्या मलायकाने साऱ्यांची मनं जिंकली आहेत. हातात लाल बांगड्या, कपाळावर टिकली, गळ्यात छानसा सोनेरी हार, नाकात नथ अन् साडी असा मलायकाचा पोशाख आहे. मलायका अरोराचा हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मलायका अरोराने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. मलायकाने केसात माळलेला गजरा खूपच सुंदर दिसत आहे. मलायका बहुतांश वेळा वेस्टर्न लूकमध्ये दिसत असला तरी यावेळी तिने आपल्या देसी स्टाईलने आता मने जिंकली आहे. मलायकाने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले- पारंपरिक ते अधिक सुंदर!

मलायका अरोराचा हा लूक व्हायरल होताच त्यावर कमेंट्स यायला सुरूवात झाली नाही. एका यूजरने लिहिले आहे- ती पन्नाशीची अजिबातच दिसत नाही. त्यानंतर आणखी एका युजरने कमेंट केली- तू खूप छान दिसतेस, खूप सुंदर दिसतेस

Web Title: Hot Bollywood Actress Malaika Arora look stunning in traditional Marathi outfit