राजू, शाम अन् बाबुराव परतणार; अखेर दिग्दर्शक प्रियदर्शने केली 'हेरा फेरी 3'ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 21:35 IST2025-01-30T21:33:57+5:302025-01-30T21:35:32+5:30

Hera Pheri 3: निर्माते-दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी हेरा फेरी 3 ची घोषणा केली आहे.

Hera Pheri 3: Finally, director Priyadarshan announced 'Hera Pheri 3' | राजू, शाम अन् बाबुराव परतणार; अखेर दिग्दर्शक प्रियदर्शने केली 'हेरा फेरी 3'ची घोषणा

राजू, शाम अन् बाबुराव परतणार; अखेर दिग्दर्शक प्रियदर्शने केली 'हेरा फेरी 3'ची घोषणा

Hera Pheri 3 : अखेर ती बातमी आली, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आज दिग्दर्शक प्रियदर्शनचा वाढदिवस असून, त्यांनी चाहत्यांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. त्यांनी हेरा फेरीचा तिसरा भाग जाहीर केला आहे. त्यांनी अभिनेता अक्षय कुमारच्या एक्स पोस्टला उत्तर देताना हेरा फेरी 3 ची घोषणा केली. 

निर्माता-दिग्दर्शक प्रियदर्शन सध्या अक्षय कुमारसोबत हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूत बांगला'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त अक्षय कुमारने सोशल मीडियावर प्रियदर्शनला शुभेच्छा दिल्या. अक्षयच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना प्रियदर्शनने हेरा फेरी 3 बद्दल एक मोठे अपडेट दिले.

अक्षयने प्रियदर्शनसोबतचा फोटो शेअर केला अन् लिहिले की, 'हॅपी बर्थडे प्रियन सर. अशा भुतांनी आणि मुक्त कलाकारांनी भरलेल्या सेटवर तुमचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा अजून चांगले काय असू शकते? तुम्ही एक अशी व्यक्ती आहात, जी गोंधळातून मास्टरपीस बनवू शकते. तुमचा दिवस कमी रिटेकने भरलेला जावो. तुमचे पुढचे वर्ष चांगले जावो.'

अन् केली हेरा फेरी 3 ची घोषणा
अक्षयच्या या पोस्टवर प्रियदर्शननेही प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले की, 'शुभेच्छांसाठी धन्यवाद अक्षय. याबदल्यात मला तुला एक गिफ्ट द्ययाचे आहे. मी हेरा फेरी 3 बनवायला तयार आहे. अक्षय, सुनील आणि परेश, तुम्ही तयार आहात का?' अशी पोस्ट प्रियदर्शनने केली. या पोस्टनंतर अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर 'वेलकम' चित्रपटातील मिरॅकल-मिरॅकल हे मीमी शेअर केले आहे. याचाच अर्थ लवकरच चाहत्यांना हेरा फेरी 3 पाहायला मिळणार आहे.

परेश रावल यांनीही दिला दुजोरा
अक्षय आणि प्रियदर्शनच्या पोस्टनंतर हेरा फेरीचे बाबू भैय्या, म्हणजेच अभिनेते परेश रावल यांनीही पोस्ट शेअर करत हेरा फेरी 3 बाबत अपडेट दिले. त्यांनी लिहिले की, 'प्रिय प्रियनजी, तुम्हीच जगाला हसण्याचा सुंदर क्षण दिला. या नेहमी हसतमुख बाळाची (प्रोजेक्ट) जबाबदारी घेतल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. #HeraPheri3' अशी पोस्ट परेश रावल यांनी लिहीली आहे. याशिवाय, अभिनेता सुनील शेट्टीनेही या याबाबत पोस्ट केली आहे.

दरम्यान, आता हेरा फेरी 3 च्या या घोषणेनंतर चाहते सोशल मीडियावर खूप खुश झाले आहेत. चाहते चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची बऱ्याच वर्षांपासून वाट पाहत होते. आता या घोषणेने त्यांच्यात कमालीची उत्सुकता वाढली आहे.

Web Title: Hera Pheri 3: Finally, director Priyadarshan announced 'Hera Pheri 3'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.