ड्रीम गर्लने फॉलो केली धर्मेंद्रची हुक स्टेप; 'जट यमला पगला दिवाना'वर केला जबरदस्त डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 11:17 IST2024-05-29T11:17:05+5:302024-05-29T11:17:44+5:30
Hema malini: हेमा मालिनी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ड्रीम गर्लने फॉलो केली धर्मेंद्रची हुक स्टेप; 'जट यमला पगला दिवाना'वर केला जबरदस्त डान्स
बॉलिवूडचा ही मॅन अशी लोकप्रियता मिळवणारे धर्मेंद्र (dharmendra) यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमा दिले. त्यामुळे त्यांच्या अभिनयाचे आज लाखो चाहते आहेत. इतकंच नाही तर त्यांच्यावर चित्रीत झालेली अनेक गाणीही लोकप्रिय आहेत. यात खासकरुन त्यांची सिग्नेचर स्टेप अनेक जण फॉलोही करतात. विशेष म्हणजे 'जट यमला पगला दिवाना' या गाण्यातील त्यांची हुक स्टेप चक्क हेमा मालिनी यांनी कॉपी केली.
सध्या सोशल मीडियावर हेमा मालिनी (hema malini) यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. २०२१ मध्ये त्यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर 4' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी धर्मेंद्र यांच्या जट यमला पगला दिवाना या गाण्यावर डान्स केला.
हेमा मालिनी यांच्यासोबत शिल्पा शेट्टीनेही या गाण्यावर डान्स केला. मात्र, ड्रीम गर्लने धर्मेंद्र यांची हुक स्टेप कॉपी केल्यावर टाळ्या आणि शिट्ट्यांची सुरुवात झाली. विशेष म्हणजे त्यांनी अगदी हुबेहूब धर्मेंद्र यांच्यासारखाच डान्स केल्यामुळे सगळे अचंबित झाले.