बापरे! केक कापताच उडाला आगीचा भडका; हर्षवर्धन राणेच्या 'एक दीवाने...'च्या सेटवर नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:37 IST2025-06-13T12:13:14+5:302025-06-13T12:37:34+5:30

VIDEO: हर्षवर्धन राणेच्या 'एक दीवाने...'च्या सेलिब्रेशन पार्टीत हेलियम फुग्यांचा स्फोट, चाहते चिंतेत 

helium balloons burst during harshvardhan rane starrer ek deewane ki deewaniyat wrap up party video viral | बापरे! केक कापताच उडाला आगीचा भडका; हर्षवर्धन राणेच्या 'एक दीवाने...'च्या सेटवर नेमकं काय घडलं? 

बापरे! केक कापताच उडाला आगीचा भडका; हर्षवर्धन राणेच्या 'एक दीवाने...'च्या सेटवर नेमकं काय घडलं? 

Harshvardhan Rane: बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे 'Harshvardhan Rane' त्याच्या आगामी 'एक दीवाने की दीवानियत' या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. दरम्यान, 'सनम तेरी कसम' नंतर हर्षवर्धन राणे इंडस्ट्रीतून गायब झाला होता. आता बऱ्याच कालावधीनंतर तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एन्ट्री करतोय. सध्या तो 'एक दिवाने की दीवानियत'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातच या चित्रपटासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. 'एक दीवाने की दीवानियत' सिनेमाच्या पार्टीमध्ये भयानक घटना घडली आहे. या पार्टीत हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाला आहे. 


हर्षवर्धन राणेच्या 'एक दीवाने की दीवानियत' च्या सेटवर अचानक हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. परंतु, यामुळे हर्षवर्धनचे चाहते चिंतेत आहेत. हर्षवर्धन राणेने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिवाय भावुक नोट देखील लिहिली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

नेमकं काय घडलं?

दरम्यान, 'सनम तेरी कसम' नंतर हर्षवर्धन राणे पुन्हा 'एक दीवाने दीवानियत' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाल्याची पाहायला मिळते आहे. 'एक दीवाने दिवानीयत' चे शेवटचं शूट चंदीगडमध्ये सुरू होतं. हे शूट पूर्ण झाल्यानंतर, चित्रपटाच्या टीमने केक कटिंग पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये हेलियम गॅसचे फुगे देखील लावण्यात आले होते. त्यावेळी अचानक ते फुगे फुटल्याने आगीचा एकच भडका उडाला. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दिग्दर्शक मिलाप जावेरी ' एक दिवाने की दीवानियत' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर मुश्ताक शेख यांनी चित्रपटाचं कथानक लिहिलं आहे. येत्या २ ऑक्टोबरला म्हणजेच गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. 

Web Title: helium balloons burst during harshvardhan rane starrer ek deewane ki deewaniyat wrap up party video viral