प्रेमी युगुलांना रडवणारा चित्रपट, बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटी गाजवायला सज्ज; जगभरात केली छप्परफाड कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:06 IST2025-12-19T14:03:22+5:302025-12-19T14:06:50+5:30
प्रेमी युगुलांना रडवणारा चित्रपट, बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटी गाजवायला सज्ज; कधी, कुठे पाहाल?

प्रेमी युगुलांना रडवणारा चित्रपट, बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटी गाजवायला सज्ज; जगभरात केली छप्परफाड कमाई
Ek Deewane Ki Deewaniyat OTT Release: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत कोणत्याही गॉडफादरशिवाय स्वत ची एक वेगळी ओळख निर्माण केली. यापैकीच एक नाव म्हणजे हर्षवर्धन राणे. 'सनम तेरी कसम' या चित्रपटातून हर्षवर्धन राणे प्रसिद्धीझोतात आला. या चित्रपटाने त्याला स्टारडम मिळून दिला. सनम तेरी कसम नंतर हर्षवर्धन राणे बऱ्याच प्रतीक्षेनंतर अलिकडेच एका रोमॅन्टिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. २०२५ मध्ये आलेला एक दीवाने की दीवानियत हा त्याचा चित्रपट एक सरप्राइज पॅकेज म्हणून समोर आला आणि त्याने बॉक्स ऑफिस गाजवलं. त्यानंतर, 'एक दिवाने की दिवानियत' हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.
'एक दिवाने की दिवानियत' हा चित्रपट सुमारे ३० ते ३५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. विशेष म्हणजे,'एक दीवाने की दिवानियत'ने आपल्या खर्चाच्या दुप्पट कमाई केली आहे. मिलाप जवेरी दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात सुमारे १०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली. ज्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. प्रेमकहाणीवर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेमी युगुलांची चांगलीच पसंती मिळाली होती. या चित्रपटात पंजाब दी कुडी सोनम बाजवा हर्षवर्धन राणेसोबत मुख्य भूमिकेत होती.कमी बजेटमध्ये बनवलेला असूनही, या चित्रपटाने सुरुवातीपासूनच चित्रपटगृहांमध्ये बरीच चर्चा निर्माण केली.
OTT वर कधी प्रदर्शित होणार?
या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, तो सुरुवातीला १६ डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता. मात्र, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता, हा चित्रपट २६ डिसेंबरला ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता, पण आता तो झी ५ वर प्रदर्शित होईल.