Happy New Year 2020 : कोणी बोल्ड तर कोणी हटके अंदाजात दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 13:22 IST2020-01-01T13:20:34+5:302020-01-01T13:22:15+5:30
बॉलिवूडमधील मंडळींनी हटक्या अंदाजात नववर्षाच्या शुभेच्छा त्यांच्या चाहत्यांना दिल्या आहेत.

Happy New Year 2020 : कोणी बोल्ड तर कोणी हटके अंदाजात दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा
सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2020 चे स्वागत करण्यात आले आहे. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतषबाजी करत नववर्षाचे दणक्यात स्वागत करण्यात आले. बॉलिवूडमधील मंडळींनी देखील आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नववर्षाचे स्वागत केले.
बॉलिवूडमधील मंडळींनी त्यांच्या हटक्या अंदाजात नववर्षाच्या शुभेच्छा त्यांच्या चाहत्यांना दिल्या आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
तर सुश्मिता सेनने बॉयफ्रेंड रोहमल आणि तिच्या दोन्ही मुली रेने आणि अलिशा यांच्यासोबत फोटो शेअर करत नवीन वर्षाचे स्वागत केले आहे.
दिशा पटानीने बोल्ड फोटो पोस्ट करत चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
तर प्रीती झिंटाने एका व्हिडिओद्वारे सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच एक छान संदेश तिने दिला आहे.
बिपाशा बासूने पती करण सिंग ग्रोव्हरसोबत फोटो पोस्ट करत सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अनिल कपूरने तर हटक्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याचा एक खूपच छान फोटो पोस्ट करत सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सारा अली खानने मंदिर, गुरुद्वारा, चर्च अशा विविध ठिकाणांवरील फोटो पोस्ट देत सगळ्यांना नववर्षाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.