कोण आहे Hansika Motwaniचा होणारा नवरा, जयपूरच्या राजेशाही पॅलेसमध्ये बांधणार लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 04:19 PM2022-10-31T16:19:44+5:302022-10-31T16:26:37+5:30

हंसिका मोटवानी कोणासोबत लग्नाचे सात फेरे घेणार आहे याचा ही खुलासा झाला आहे. अभिनेत्रीच्या लग्नासाठी जयपूरचा एक राजेशाही पॅलेसही बुक करण्यात आला आहे.

Hansika Motwanis mystery man name when and where is the wedding taking place | कोण आहे Hansika Motwaniचा होणारा नवरा, जयपूरच्या राजेशाही पॅलेसमध्ये बांधणार लग्नगाठ

कोण आहे Hansika Motwaniचा होणारा नवरा, जयपूरच्या राजेशाही पॅलेसमध्ये बांधणार लग्नगाठ

googlenewsNext

Hansika Motwani Wedding Details:  टीव्ही ते टॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी(Hansika Motwani)च्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. ही अभिनेत्री डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधणार र आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री हंसिका मोटवानी यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्न करणार आहे. त्यासाठी जयपूरचा एक राजेशाही पॅलेसही बुक करण्यात आला आहे. हंसिका मोटवानी कोणासोबत लग्नाचे सात फेरे घेणार आहे याचा ही खुलासा झाला आहे. 


कधी होणार हंसिका मोटवानीचं लग्न 
हंसिका मोटवानी ४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, विवाहसोहळा 2 डिसेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हे डेस्टिनेशन वेडिंग असेल ज्यामध्ये फक्त त्याचे कुटुंब आणि जवळचे मित्र जयपूरला जातील. रिपोर्टनुसार, 4 डिसेंबरच्या संध्याकाळी फेरे होतील, तर त्याच दिवशी सकाळी हळद समारंभ होईल. 2 डिसेंबरला सुफी रात्री, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मेहंदी, संगीत होईल. पार्टीनंतर थीम असलेली कॅसिनो चौथ्या दिवशी संध्याकाळी होईल. याशिवाय दररोज एक ड्रेस कोड आणि थीम असेल. जयपूरमधील मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये हे लग्न होणार आहे.

कोण आहे हंसिकाचा होणार पती?
हंसिका मोटवानीचे हे अरेंज्ड मॅरेज असल्याच्या बातम्या आल्या होत्या पण तिच्या एका जवळच्या मैत्रिणीने खुलासा केला आहे की अभिनेत्री लव्ह मॅरेज करणार आहे. हंसिका काही काळापासून ज्याला डेट करत होती त्याच्यासोबतच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. हंसिका मोटवानीचा होणाऱ्या पतीचं नाव सोहेल कथुरिया आहे, जो एक मुंबईतला बिझनेसमन आहे. डेटींगपूर्वी दोघे जवळचे मित्र होते आणि एका फर्ममध्ये भागीदारही आहेत.

हंसिका मोटवानी किंवा तिच्या कुटुंबीयांकडून अद्याप तिच्या लग्नाबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही. अभिनेत्रीचे चाहते तिच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहेत.
 

Web Title: Hansika Motwanis mystery man name when and where is the wedding taking place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.