ओळखा पाहू कोण? कुरळ्या केसांमधील या ‘मुन्नी’ला ओळखलंत का? नाव वाचून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 15:26 IST2023-04-11T15:24:00+5:302023-04-11T15:26:44+5:30
Guess who? बॉलिवूड सेलिब्रिटीजचे लहानपणीचे फोटो पाहताना चाहत्यांना मजा येते. त्यामुळे असे फोटो क्षणात व्हायरल होतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

ओळखा पाहू कोण? कुरळ्या केसांमधील या ‘मुन्नी’ला ओळखलंत का? नाव वाचून व्हाल थक्क
बॉलिवूड सेलिब्रिटीजचे लहानपणीचे फोटो पाहताना चाहत्यांना मजा येते. त्यामुळे असे फोटो क्षणात व्हायरल होतात. अगदी अमिताभ बच्चन, सलमान, शाहरूखपासून आलिया, रणवीरपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या फोटोत दोन बहिणी पोझ देताना दिसत आहेत. या दोन्ही बहिणी अभिनेत्री आहेत. अर्थात पैकी एक बहिण बॉलिवूडमधून गायब झालीये. ती दिसते ती केवळ बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये. दुसरी मात्र सतत या ना त्या कारणानं चर्चेत असते. कधी बोल्ड फोटो, कधी फिटनेस, कधी रिलेशनशिपमुळे ती प्रकाशझोतात असते. बॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या आयटम नंबरमध्ये ती दिसली आहे. खान कुटुंबाशी तिला संबंध आहे.
अद्यापही तुम्ही तिला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. फोटोतील या दोघी बहिणी अन्य कुणी नसून मलायका अरोरा (Malaika Arora ) व तिची बहिण अमृता अरोरा आहेत. मलायकाने आपल्या बहिणीबरोबरचे बालपणीचे फोटो तिने शेअर केले आहेत. यात दोघींनाही ओळखणं कठीण आहे. मलायका तर ओळखूच येत नाही. विशेषत: कुरळ्या केसांच्या लुकमधला तिचा हा फोटो पाहून चाहतेही हैराण आहेत. मलायका अरोराने ‘सिबलिंग डे’निमित्त बहीण अमृताबरोबरचे बालपणीचे खास फोटो शेअर केले आहेत. आजारपणापासून आरोग्यापर्यंत, तू नेहमी माझ्या पाठीशी असते, आणि हो ही फारच वाईट हेयरस्टाइल आहे..., असं कॅप्शन देत मलायकाने हे फोटो शेअर केले आहेत.
अमृता ही मलायकाची बहिण आहेच पण तिची बेस्ट फ्रेंडही आहे. मलायका, अमृता, करीना कपूर आणि करिश्मा कपूर अशा चौघींची गर्ल गँगही प्रसिद्ध आहे. ही गर्ल गँग नेहमीच पार्टी एन्जॉय करताना दिसते.
मलायकाचे बालपणीचे फोटो पाहून चाहते शॉक्ड आहेत. विशेषत: तिचे कुरळे केस पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या फोटोंवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. मिडल क्लास मुलींसारख्या दिसतायत दोघी.., आंधळापण सांगेल आता ज्या दिसताय ती सगळी प्लास्टिक सर्जरीची कमाल, अशी कमेंट एका युजरने केली आहे. दोघी मिडल क्लास फॅमिलीतून आल्या आणि श्रीमंत मुलांशी लग्न केलं. मेहनत करायची गरजच नाही. श्रीमंत माणसांशी लग्न करा आणि आयुष्य सुखकर बनवा, अशी कमेंटही पाहायला मिळतेय.