तुझं अफेअर सुरु आहे का? पत्नीच्या आरोपानंतर विचारलेल्या प्रश्नावर गोविंदा म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:26 IST2026-02-10T13:26:05+5:302026-02-10T13:26:54+5:30

गोविंदाने का मागितली माफी?

govinda reacts on allegations made by his wife sunita ahuja about his affair | तुझं अफेअर सुरु आहे का? पत्नीच्या आरोपानंतर विचारलेल्या प्रश्नावर गोविंदा म्हणाला...

तुझं अफेअर सुरु आहे का? पत्नीच्या आरोपानंतर विचारलेल्या प्रश्नावर गोविंदा म्हणाला...

प्रसिद्ध अभिनेता 'चीची' म्हणजेच गोविंदा बऱ्याच महिन्यांपासून चर्चेत आहे. त्याची पत्नी सुनिता आहुजाच गोविंदावर काही ना काही आरोप करत आहे.  गोविंदा एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याचाही तिने आरोप केला ज्याची सर्वत्र चर्चा झाली. तसंच सुनिताने गोविंदाला काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट दिल्याचंही बोललं गेलं. आता पत्नीच्या आरोपांवर गोविंदाने सविस्तर उत्तर दिलं आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा म्हणाला, "माझ्यावर असे आरोप आधीही केले गेले आहेत. सुरुवातीला मुलींना नुसता स्पर्श करायलाही माझे हात थरथर कापायचे तेव्हाही माझ्यावर असे आरोप झाले. जी व्यक्ती आरोप लावतीये ती माझं लहानपणीचं प्रेम आहे. मी प्रेमात कायमच कमनशिबी राहिलो. (हसतच) तरुणपणीचं प्रेमही मला सोडून गेलं. आता जर कोणाला असं वाटतंय की मी कोणाच्या प्रेमात आहे तर हे म्हातारपणीचं प्रेम म्हणायला हवं. बैलाला जेव्हा अनेक वर्ष शेतीच्या कामात जुंपलं जातं आणि नंतर जेव्हा त्याच्याकडून काम होत नाही असं लोकांना वाटतं तेव्हा त्या कत्तलखान्यात पाठवलं जातं. तसंच हे आहे...काय फरक पडतो? "

तो पुढे म्हणाला, "मी चार चार सुपरस्टार, मिस युनिव्हर्स सोबतही काम केलं त्यांच्याकडेही मी कधी तशा नजरेने पाहिलं नाही. माझी एकही हिरोईन माझ्याबद्दल तक्रार करणार नाही. मी कोणाला अपशब्दही बोललो नाही. माझी आईही अभिनेत्री होती. मी कधीच कोणत्या अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केलेलं नाही. अशात माझी पत्नीच माझं नाव घेऊन आरोप करत आहे हे सगळं चांगलं वाटत नाही. मी माफी मागतो...कारण मला अजूनही काम करायचं आहे. ज्या नवीन अभिनेत्री आहेत त्या हे आरोप ऐकून घाबरुन जायला नको. माझ्या प्रोडक्शनसोबत कोणी कामच करणार नाही. मी जे काही आहे ते चाहत्यांमुळे आहे. भविष्यातही मला काम करायचं आहे."

Web Title : पत्नी के आरोपों पर गोविंदा का जवाब; अफेयर से इनकार।

Web Summary : गोविंदा ने पत्नी के अफेयर के आरोपों का खंडन किया और अतीत के निराधार आरोपों का हवाला दिया। उन्होंने महिला सहयोगियों के प्रति सम्मान व्यक्त करते हुए कहा कि कोई भी अभिनेत्री उनके व्यवहार के बारे में शिकायत नहीं कर सकती। उन्होंने माफी मांगी और उम्मीद जताई कि दावों से भविष्य में सहयोग नहीं रुकेगा।

Web Title : Govinda addresses affair allegations by wife; denies relationship.

Web Summary : Govinda refuted his wife's affair allegations, citing past unfounded accusations. He emphasized his respect for female colleagues, stating no actress can complain about his behavior. He apologized, hoping the claims won't deter future collaborations.