"अक्षय खन्नामुळे मला मुलींनी..."; नवाजुद्दीन सिद्दीकी स्पष्टच म्हणाला, सांगितला खास किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 17:54 IST2026-01-02T17:50:21+5:302026-01-02T17:54:33+5:30
अक्षय खन्नाचा आजवर कधीच न ऐकलेला किस्सा नवाजुद्दीनने सांगितला आहे. हा किस्सा वाचून तुम्हीही चकीत व्हाल. नेमकं काय घडलं होतं?

"अक्षय खन्नामुळे मला मुलींनी..."; नवाजुद्दीन सिद्दीकी स्पष्टच म्हणाला, सांगितला खास किस्सा
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या 'धुरंधर' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. अक्षय खन्नाने त्याच्या कारकीर्दीत अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. अक्षय खन्नासोबत अशाच एका सिनेमात काम केलेला अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीनने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा अक्षय खन्नासंबंधी आहे. तो वाचून तुम्हीही चकीत व्हाल.
'मॉम' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नवाजुद्दीनने अक्षय खन्ना समोरच हा किस्सा शेअर केला होता. नवाज म्हणाला, "जेव्हा माझे लग्न ठरत नव्हते आणि मी अनेक ठिकाणी प्रयत्न करत होतो, तेव्हा अनेक मुली मला नकार देत असत. मी जेव्हा त्या मुलींना विचारायचो की तुम्हाला कसा मुलगा हवा आहे, तेव्हा त्या अक्षय खन्नाचं नाव घ्यायच्या. त्याकाळी अक्षय खन्नाची मुलींमध्ये प्रचंड क्रेझ होती."
नवाजुद्दीन लग्नासाठी ज्या मुलीला भेटायचा, ती प्रत्येक मुलगी अक्षय खन्नाची चाहती असायची. "कोणी अक्षयच्या स्माईलचं कौतुक करायचे, तर कोणाला अक्षयचे डोळे आवडायचे. अक्षयचा मुलींवर एक वेगळाच प्रभाव होता. त्यामुळे मला त्याकाळी लग्नासाठी अनेक मुलींकडून नकार मिळत गेला," असे नवाजने मिश्किलपणे सांगितले. नवाजचे हे बोलणे ऐकून अक्षय खन्नालाही हसू आवरले नाही.
अक्षय खन्नाच्या 'धुरंधर'ची चर्चा
अक्षय खन्ना सध्या त्याच्या 'धुरंधर' या चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे आणि विशेषतः Fa9la या गाण्यावर त्याने केलेल्या डान्सचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. अक्षय मोजकेच सिनेमे करत असला तरीही, त्याचा चाहता वर्ग आजही तितकाच मोठा आहे. धुरंधरमुळे अक्षयची पुन्हा एकदा निर्माण झालेली क्रेझ हे याचंच प्रतीक आहे.