देशमुखांच्या लातूरमधल्या घरी असा होता आषाढी एकादशीचा बेत, जिनिलियाने दाखवली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 18:30 IST2024-07-17T18:29:48+5:302024-07-17T18:30:44+5:30
देशमुख कुटुंब अनेक वेळा त्यांच्या लातूर येथील घरी असतात. महत्वाचे सण ते तिथेच साजरे करतात.

देशमुखांच्या लातूरमधल्या घरी असा होता आषाढी एकादशीचा बेत, जिनिलियाने दाखवली झलक
आज आषाढी एकादशी. विठ्ठलाचं दर्शन आणि दिवसभर उपवास करुन अनेक ठिकाणी आषाढी साजरी केला जात आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी जमते. दुसरीकडे महाराष्ट्राच्या लाडक्या देशमुख कुटुंबात एकादशी कशी साजरी होतेय याची झलक जिनिलिया देशमुखने (Genelia Deshmukh) दाखवली आहे. इन्स्टाग्रामवर तिने याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
देशमुख कुटुंब अनेक वेळा त्यांच्या लातूर येथील घरी असतात. महत्वाचे सण ते तिथेच साजरे करतात. आज आषाढी एकदशी निमित्त जिनिलिया तिच्या मुलांसह आणि सासूसह लातूरच्या घरी आहे. आजचा काय खास बेत आहे याची झलक तिने दाखवली आहे. साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी, वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी, ड्रायफ्रुट्स असा परिपूर्ण आहार आहे. जिनिलियाची दोन्ही मुलं, पुतणे आणि सासू याचा आस्वाद घेतानाचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. या व्हिडिओत रितेश मात्र दिसत नाही. 'एकादशीनिमित्त लातूरमध्ये खास बेत' असं कॅप्शन तिने दिलं आहे.
रितेश-जिनिलिया आणि त्यांच्या मुलांच्या साधेपणाचं नेहमीच कौतुक होतं. ही जोडी कायमच चाहत्यांच्या मनात असते. रितेश-जिनिलियाचे अनेक व्हिडिओही, रील्सही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांची जोडी सगळ्यांची लाडकी आहे. तसंच जिनिलिया जेव्हा मराठमोळा लूक करते तेव्हा चाहते तिच्यावर फिदा होतात. दोघांना चाहते प्रेमाने महाराष्ट्राचे दादा-वहिनी संबोधतात.