काय झालीये मृण्मयी देशपांडेची अवस्था? बहीण गौतमीनेच दिली माहिती, म्हणाली, 'पुढच्या वेळी...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 16:59 IST2023-08-06T16:58:54+5:302023-08-06T16:59:25+5:30
मृण्मयी ढसाढसा रडतानाचा हा व्हिडिओ पोस्ट करुन गौतमी म्हणाली,...

काय झालीये मृण्मयी देशपांडेची अवस्था? बहीण गौतमीनेच दिली माहिती, म्हणाली, 'पुढच्या वेळी...'
मराठमोळ्या अभिनेत्री आणि सख्ख्या बहिणी मृण्मयी देशपांडे-गौतमी देशपांडे (Mrunmayee Deshpande-Gautami Deshpande) यांच्या भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. त्यांचे हे व्हिडिओ नेटकरी खूपच एन्जॉय करतात. घराघरात बहिण भावांमध्ये जशी छोटीमोठी भांडणं होत असतात अगदी तशीच भांडणं या दोन बहिणींचीही होतात. एकमेकांना चिडवायचं आणि रडायचं हेच त्यांचंही सुरु असतं. तर गौतमीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये मृण्मयी ढसाढसा रडताना दिसत आहे. नक्की झालंय काय बघुया...
मृण्मयी देशपांडेची गौतमी ही धाकटी बहीण आहे. अनेकदा मृण्मयी मोठी असल्याचा फायदा घेत गौतमीला रडवते आणि व्हिडिओही काढते. आता यावेळी गौतमीने बदला घेतला आहे. तिने मृण्मयीला रडवलं असून त्याचा व्हिडिओही काढला आहे. मृण्मयी थकून घरी आल्यानंतर आपल्या खोलीत आराम करायला जाते. ती गौतमीला बाहेर जायला सांगते पण गौतमी काही जात नाही. गौतमी त्रास देतीये हे बघून मृण्मयी अक्षरश: ढसाढसा रडत आहे. त्यांची आई मृण्मयीची समजूत काढत आहे पण मृण्मयी काही ऐकत नाही. व्हिडिओच्या सुरुवातीला गौतमी म्हणते,'माय डियर ताई , पुढच्या वेळी मला मारताना आणि रडवताना थोडासा विचार कर. कारण हे सगळं तुझ्यासोबतही घडू शकतं.कर्मा काय आहे हे तुलाही माहीत आहे आणि करारा जवाब मिलेगा, तोही असा...'
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही दोघींची मजा घेतली आहे.'बापरे! इतके मोठे झाल्यावर सुद्धा बहिणी असेच भांडतात का! माझ्या दोन मुली (७ आणि ३ वर्षा ) खूप भांडतात आणि मी माझी समजूत काढते कि मोठ्या झाल्या कि नाही असा वागणार' अशा मजेशीर कमेंट एकीने केली आहे. 'तर लहान बहिणीच्या नादी लागू नये' अशी कमेंट दुसरीने केली आहे.