Gauri Khan : खान्स का पॉवर...! गौरी खानने शेअर केला क्लासी फॅमिली फोटो, चाहत्यांना दिली गुडन्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 13:18 IST2023-03-27T12:18:11+5:302023-03-27T13:18:50+5:30
Shah Rukh Khan, Gauri Khan : अलीकडे रिलीज झालेल्या शाहरूखच्या पठाण या सिनेमानं जगभर रेकॉर्डब्रेक कमाई केली. पण सध्या चर्चा शाहरूखची नाही तर त्याची बेटर हाफ गौरी खानची आहे...

Gauri Khan : खान्स का पॉवर...! गौरी खानने शेअर केला क्लासी फॅमिली फोटो, चाहत्यांना दिली गुडन्यूज
शाहरूखला (Shah Rukh Khan) बॉलिवूडचा किंगखान म्हणतात ते उगाच नाही. केवळ भारतातच नव्हे तर जगभर त्याचे चाहते आहेत. अलीकडे रिलीज झालेल्या शाहरूखच्या पठाण या सिनेमानं जगभर धुमाकूळ घातला, तो म्हणूनच. या सिनेमानं जगभर रेकॉर्डब्रेक कमाई केली. पण सध्या चर्चा शाहरूखची नाही तर त्याची बेटर हाफ गौरी खानची (Gauri Khan ) आहे. होय, गौरी प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आता ती एक नवी इनिंग सुरु करतेय. नुकताच गौरी खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गौरी तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत क्लासी पोज देताना दिसत आहे. यासोबत तिने एक मोठी घोषणाही केलीये.
गौरी खानने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आपल्या कुटुंबाचा एक सुंदर फोटो शेअर केला. या फॅमिली फोटोत शाहरुख खान, मुलगी सुहाना खान, मोठा मुलगा आर्यन खान आणि लहान मुलगा अबराम खान असे सगळेच झक्कास पोझ देताना दिसत आहेत. सगळे जण ब्लॅक ड्रेसमध्ये आहेत. शाहरुखने ब्लॅक टी- ब्लॅक जीन्स घातली आहे, तर सुहाना खान ब्लॅक अँड व्हाइट कॉम्बिनेशनच्या जंपसूटमध्ये आहे. गौरीने काळ्या रंगाचा वनपीस घातला आहे. आर्यन आणि अबरामनेही काळ्या रंगाचा टीशर्ट, जीन्स आणि जॅकेट घातलं आहे.
‘कुटुंब तेच आहे जे घर बनवते… उत्साही… कॉफी टेबल बुक… लवकरच येत आहे.’ असं कॅप्शन देत गौरीनं हा फोटो शेअर केला आहे. या कॅप्शनवरून तुम्हाला अंदाज आला असेलच. ते काय तर पहिलं पुस्तक. होय, My Life In Design हे तिचं पहिलं वहिलं पुस्तक येत्या काही दिवसांत प्रकाशित होतेय. म्हणजेच आता गौरी लेखन क्षेत्रातही पदार्पण करतेय.