१० वर्षांच्या संसारानंतर गौरव खन्ना खरंच घेतोय घटस्फोट? पती आकांक्षाबद्दल स्पष्टच म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:19 IST2026-02-18T13:17:59+5:302026-02-18T13:19:11+5:30

'बिग बॉस १९' चा विजेता गौरव खन्ना सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Gaurav Khanna Divorce Rumors Clarification Wife Akanksha Chamola Cryptic Post Truth | १० वर्षांच्या संसारानंतर गौरव खन्ना खरंच घेतोय घटस्फोट? पती आकांक्षाबद्दल स्पष्टच म्हणाला...

१० वर्षांच्या संसारानंतर गौरव खन्ना खरंच घेतोय घटस्फोट? पती आकांक्षाबद्दल स्पष्टच म्हणाला...

टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि 'बिग बॉस १९' चा विजेता गौरव खन्ना सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून गौरव आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्यात बिनसल्याच्या आणि ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आकांक्षाने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता स्वतः गौरवने यावर भाष्य केलं आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत गौरवने घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "अशा बातम्या कुठून येतात हेच मला समजत नाही. मला वाटतं हे सर्व  कीबोर्ड वॉरियर्सचे'काम आहे, जे कोणत्याही व्यक्तीबद्दल दावा करण्यापूर्वी साधी शहानिशा करण्याची तसदीही घेत नाहीत. आमच्या नात्याबद्दलचे हे दावे पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत".

आकांक्षाच्या 'त्या' पोस्टमागचं कारण काय?
आकांक्षा चमोलाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यावरून त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. याबद्दल खुलासा करताना गौरव म्हणाला, "आकांक्षाची ती पोस्ट तिच्या आगामी वेब सीरिजसाठी आणि अभिनयातील कमबॅकसाठी होती. ती पुन्हा एकदा अभिनयाकडे वळत आहे आणि त्या प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी तिने ती पोस्ट केली होती. लोकांचा असा समज झाला की, ती आमच्या नात्याबद्दल बोलत आहे, पण त्याचा आमच्या वैयक्तिक आयुष्याशी काहीही संबंध नाही".

"आम्ही एकत्र आणि आनंदी आहोत"
गौरवने पुढे स्पष्ट केले की, ते एक जोडपे म्हणून अतिशय आनंदी आहेत. तो म्हणाला, "आम्ही नेहमीच एकमेकांच्या निर्णयांचा आणि भावनांचा आदर केला आहे. आकांक्षा पुन्हा एकदा काम सुरू करत आहे, ज्याचे मी पूर्ण समर्थन करतो. आमचं लग्न तुटत असल्याच्या बातम्यांमध्ये काडीचाही दम नाही". दरम्यान, गौरव खन्नाने आपल्या पत्नीच्या 'मुले न होण्याच्या' निर्णयाचे 'बिग बॉस'च्या घरातही समर्थन केले होते, ज्यामुळे त्याचे मोठे कौतुक झाले होते. 

Web Title : गौरव खन्ना ने 10 साल बाद तलाक की अफवाहों का खंडन किया।

Web Summary : अभिनेता गौरव खन्ना ने पत्नी आकांक्षा चमोला से तलाक की अफवाहों का खंडन किया। उन्होंने स्पष्ट किया कि उनकी सोशल मीडिया पोस्ट उनके करियर में वापसी के लिए थी, न कि रिश्ते के मुद्दों के लिए। वे खुश और सहायक हैं।

Web Title : Gaurav Khanna denies divorce rumors after 10 years of marriage.

Web Summary : Actor Gaurav Khanna refutes rumors of divorce from wife Akanksha Chamola. He clarified her social media post was for her career comeback, not relationship issues. They are happy and supportive.