'मंडला मर्डर्स' ते 'सरजमीन, या वीकेंडला काय पाहता येणार? घ्या जाणून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 18:16 IST2025-07-25T18:15:51+5:302025-07-25T18:16:04+5:30
जाणून घेऊया या आठवड्यात ओटीटी आणि थिएटरमध्ये कोणते चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाले आहेत.

'मंडला मर्डर्स' ते 'सरजमीन, या वीकेंडला काय पाहता येणार? घ्या जाणून
जुलैचा हा आठवडा खूप खास आहे. प्रेक्षकांना थिएटरसह ओटीटीवरही मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. आज शुक्रवारी वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट आणि सीरिज रिलीज झाले आहेत. ड्रामा, थ्रिलर, ॲक्शनपासून रोमँटिक असे अनेक पर्याय आहेत. तर क्षणही वाया न घालवता, ओटीटी आणि थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊया.
या आठवड्यात काय पाहाल?
सरजमीन (Sarzameen)
दक्षिण सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन आणि अभिनेत्री काजोलचा दमदार देशभक्तीपट 'सरजमीन' प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. विशेष म्हणजे सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान या चित्रपटात झळकला आहे. हा चित्रपट जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला आहे.
'महावतार नरसिम्हा (Narsimha)
'केजीएफ' आणि 'कांतारा'सारख्या हिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या होम्बाले फिल्म्सचा पौराणिक आणि अत्यंत चर्चेत असलेला ''महावतार नरसिम्हा'' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांना दमदार व्हिज्युअल्स आणि कथा अनुभवायला मिळतेय.
मंडला मर्डर्स (Mandala Murders)
अभिनेत्री वाणी कपूरची क्राईम थ्रिलर वेब सीरिज 'मंडला मर्डर्स' नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाली आहे. या सीरिजमध्ये वाणी इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर रिया थॉमसच्या भूमिकेत आहे.
रंगीन (Rangeen)
'छावा' आणि 'जाट'सारख्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध विनीत कुमार सिंग याची नवीन वेब सीरिज 'रंगीन' अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली आहे. याची कथा एका पुरुषावर आधारित आहे, ज्याचा त्याच्या पत्नीकडून विश्वासघात होतो आणि तो त्या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी एक मोठे पाऊल उचलतो.
ट्रिगर (Trigger)
कोरियन ड्रामाचे चाहते असाल, तर 'ट्रिगर' ही सीरिज तुमच्यासाठी आहे. के-ड्रामा सुपरस्टार्स किम नोम-गिल आणि किम यंग-क्वांग अभिनीत ही थ्रिलर सीरिज नेटफ्लिक्सवर आज रिलीज होतेय. थरार आणि उत्कंठावर्धक कथानक असलेली ही सीरिज नक्कीच पाहण्यासारखी आहे.