Friday Release: थिएटर आणि ओटीटीवर धमाकेदार चित्रपट-वेब सीरिज प्रदर्शित, कुठे पाहणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:10 IST2025-02-14T15:09:22+5:302025-02-14T15:10:21+5:30
आज थिएटर आणि ओटीटी या दोन्हीवर धमाकेदार चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत.

Friday Release: थिएटर आणि ओटीटीवर धमाकेदार चित्रपट-वेब सीरिज प्रदर्शित, कुठे पाहणार?
आजचा शुक्रवार अनेक प्रकारे खास आहे. कारण १४ फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 202) देखील साजरा केला जातोय. जर तुम्हालाही आपल्या जोडिदारासोबत थिएटरमध्ये जात चित्रपट पाहायला असेल किंवा तुम्हाला घरीच बसून ओटीटीवर काही नवीन पाहायचं असेल तर तुमची इच्छा पुर्ण झालीच म्हणून समजा. कारण, आज थिएटर आणि ओटीटी या दोन्हीवर धमाकेदार चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत.
थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याची इच्छा असेल तर आज अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतिक्षित 'छावा' (Chhaava) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यात विकी व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
'रांझना' आणि 'अतरंगी रे' सारखे उत्तम चित्रपट देणारे हे चित्रपट दिग्दर्शक यावेळी निर्माते म्हणून 'नखरेवाली' चित्रपट घेऊन येत आहेत. हा एक रोमँटिक ड्रामा थ्रिलर आहे, ज्यामध्ये अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव हे नवागत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट आज मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.
पण, तुम्हाला जर ओटीटीवर पाहायचं असेल तर आज अभिनेत्री यामी गौतम आणि प्रतीक गांधी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धूम धाम' देखील प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
याशिवाय, उन्नी मुकुंदन यांच्या अॅक्शन थ्रिलर मल्याळम चित्रपट मार्कोच्या ओटीटी रिलीजची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आता हा चित्रपट प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर ऑनलाइन स्ट्रीम करण्यासाठी सज्ज आहे. जर तुम्ही अजून मार्को पाहिला नसेल, तर तुम्ही तो आज घरी बसून पाहू शकता.
एवढंच नाही तर तुम्हाला कोरियन ड्रामा पाहण्याची आवड असेल, तर या शुक्रवारी प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर I Am Married...But! वेबसिरीज प्रदर्शित होत आहे.