Forbes India Celebrity List : सलमान खान राहिला टॉपवर, दीपिका पादुकोणने प्रियांका चोप्राला टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 17:12 IST2018-12-05T17:01:53+5:302018-12-05T17:12:45+5:30
सलमान खान फक्त बॉक्स ऑफिसचा सुलतान नाही तर कमाईच्या बाबतीत ही तो बॉलिवूडचा सुलतान आहे. फोर्ब्सना 2018 मधली सर्वात श्रीमंत सेलिब्रेटींची यादी जाहीर केली आहे.

Forbes India Celebrity List : सलमान खान राहिला टॉपवर, दीपिका पादुकोणने प्रियांका चोप्राला टाकले मागे
सलमान खान फक्त बॉक्स ऑफिसचा सुलतान नाही तर कमाईच्या बाबतीत ही तो बॉलिवूडचा सुलतान आहे. फोर्ब्सना 2018 मधली सर्वात श्रीमंत सेलिब्रेटींची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार 52 वर्षांच्या सलमानने यावर्षी 253.25 कोटींची कमाई केली आहे. सलमानचे या यादीत पहिलं स्थान पटकवण्याचे काही पहिलं वर्ष नाही तर याआधी ही 2 वर्ष सलमान फो टॉपवरच होता.
या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. यावर्षी विराटने 228 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. तर फोर्ब्सच्या यादीत तिसऱ्या स्थानावर खिलाडी कुमार म्हणजे अर्थात अक्षय कुमार आहे. यावर्षी अक्षयला सिनेमातून 185 कोटींची कमाई झाली आहे. बॉलिवूडचा किंग खानने ही या यादीत 13वे स्थान पटकावले आहे. गेल्यावर्षी एक ही सिनेमा प्रदर्शित न झाल्यामुळे त्याला 13 व्या स्थावनावर समाधान मानावे लागले. शाहरुखची कमाई त्यामुळे फक्त 56 कोटी इतकीच राहिली.
दीपिका पादुकोण या यादीत चौथ्या स्थानावर आहे आणि अभिनेत्रींच्याबातीत बोलायचे झाले तर पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवणारी ती एकमेव अभिनेत्री आहे. दीपिकाची वर्षभरात 113 कोटी इतकी कमाई झाली. तर देसीगर्ल प्रियांका चोप्रानेसुद्धा फोर्ब्सच्या यादीत आपली जागा पटाकावली आहे. नुकतीच मिसेस जोनास झालेल्या प्रियांकाला या यादीत 18 वे स्थान मिळाले आहे. प्रियांका शिवाय आलिया भट्ट, ऐश्वर्या राय बच्चन, सचिन तेंडुलकर सारख्या अनेक कलाकारांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश आहे.