साखर नाही तर 'या' दोन गोष्टी सोडून २५ किलो वजन कमी केलं, फरदीन खानचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 10:10 IST2025-06-12T10:07:06+5:302025-06-12T10:10:20+5:30

बॉलिवूड अभिनेता फरदीन खानने त्याचं प्रचंड वाढलेलं वजन कसं कमी केलं, याचा खुलासा एका मुलाखतीत केलाय. प्रत्येकाने जरुर वाचा. उपाय सोपा आहे

fardeen khan weight loss journey not having cigarettes and alcohol housefull 5 actor | साखर नाही तर 'या' दोन गोष्टी सोडून २५ किलो वजन कमी केलं, फरदीन खानचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

साखर नाही तर 'या' दोन गोष्टी सोडून २५ किलो वजन कमी केलं, फरदीन खानचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

बॉलिवूड अभिनेता फरदीन खान (fardeen khan) हा सध्या इंडस्ट्रीत चर्चेत आहे. फरदीन खान मधल्या काळात बॉलिवूडमधून गायब होता. पण गेल्या काही महिन्यांमध्ये फरदीन पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रीय झाला आहे. 'हिरामंडी' या वेबसीरिजमधून आणि 'खेल खेल में' या सिनेमातून फरदीनने बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केलं. काही वर्षांपूर्वी फरदीनकडे जेव्हा काम नव्हतं, तेव्हा त्याचं वजन प्रचंड वाढलं होतं. फरदीनने केवळ दोन गोष्टी सोडून त्याचं वजन कसं कमी केलं, याविषयी मोठा खुलासा केला आहे.

फरदीनने सांगितलं फॅट टू फिटचा प्रवास

फरदीन खानने एका मुलाखतीत सांगितले की, २०१९-२० दरम्यान त्याचे वजन १०२-१०३ किलोपर्यंत गेले होते. या वाढलेल्या वजनामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला होता. याशिवाय त्याला मानसिक ताण आणि थकवा जाणवू लागला होता. त्यानंतर त्याने स्वतःमध्ये मोठा बदल घडवायचा निर्णय घेतला. त्याने दररोज व्यायाम, संतुलित आहार, आणि वेळेवर झोप याकडे लक्ष दिलं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे, आज त्याचं वजन ७८ किलोच्या आसपास आलं आहे.


दोन गोष्टी फरदीनने सोडल्या

'फॅट टू फिट'च्या या प्रवासात सर्वात मोठा निर्णय म्हणजे फरदीनने दारू आणि सिगारेट यांसारख्या व्यसनांपासून पूर्णतः सुटका करून घेतली. त्याने सांगितले की, २०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात त्याने दारू पिणं पूर्णपणे थांबवलं, कारण त्याला जाणवलं की ती गोष्ट त्याच्या शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम करतेय. त्यामुळे फरदीनने दारु आणि सिगारेट पिणं पूर्ण बंद केलं. याचा चांगला परिणाम फरदीनच्या आरोग्यावर झाला आणि त्याच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. फरदीन खानचा हा अनुभव आजच्या तरुण पिढीसाठी आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे. फरदीन नुकत्याच रिलीज झालेल्या 'हाऊसफुल ५' सिनेमात झळकला आहे.

Web Title: fardeen khan weight loss journey not having cigarettes and alcohol housefull 5 actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.