"सर्वांना सांगा, ही माझी बायको नाही!"; पापाराझींसमोरच काय म्हणाला फरदीन खान? व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:33 IST2026-03-24T14:22:11+5:302026-03-24T14:33:07+5:30

पापाराझी फरदीन आणि त्या महिलेचा फोटो टिपायला गेले. त्यावेळी फरदीनने सर्वांना चांगलंच फटकारलं. ''ही माझी बायको नाही'', असं फरदीन म्हणाला. नेमकं काय घडलं?

Fardeen Khan say in front of the paparazzi about his wife Video is going viral | "सर्वांना सांगा, ही माझी बायको नाही!"; पापाराझींसमोरच काय म्हणाला फरदीन खान? व्हिडीओ होतोय व्हायरल

"सर्वांना सांगा, ही माझी बायको नाही!"; पापाराझींसमोरच काय म्हणाला फरदीन खान? व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेता फरदीन खान हा लाईमलाईटपासून दूर असला तरीही चर्चेत असतो. मात्र, नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगामुळे तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या इव्हेंटमध्ये फरदीन खान एका महिलेसोबत दिसला. त्यावेळी पापाराझी फरदीन आणि त्या महिलेचा फोटो टिपायला गेले. त्यावेळी फरदीनने सर्वांना चांगलंच फटकारलं. ''ही माझी बायको नाही'', असं फरदीन म्हणाला. नेमकं काय घडलं?

फरदीन अनेकदा जाहीर कार्यक्रमांमध्ये या महिलेसोबत दिसतो. त्यामुळे पापाराझींना वाटतं ही फरदीनची बायको आहे. त्यामुळे अनेकदा पापाराझी त्या महिलेला फरदीनची बायको समजतात आणि तिला तशीच हाक मारतात. परंतु यावेळी फरदीनने मात्र सर्वांचा गोंधळ दूर केला. फरदीन म्हणाला, ''सर्वांना सांगा की, ही माझी बहीण आहे, बायको नाही. अनेक सोशल मीडिया हँडल्सवर ही माझी बायको आहे, असंच तुम्ही लिहिता.'', अशा शब्दांत फरदीनने पापाराझींना समजावलं. सुरुवातीला फरदीन काहीसा चिडलेला दिसला पण नंतर मात्र हसतहसत फरदीनने परिस्थिती सांभाळली. 


फरदीन खानची बहीण लैला खान ही प्रसिद्ध फर्निचर डिझाइनर असून ती फारशी प्रसिद्धीझोतात राहत नाही. दुसरीकडे, फरदीन आणि त्याची पत्नी नताशा माधवानी यांच्या वैवाहिक आयुष्यात काही काळ दुरावा असल्याच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून रंगत होत्या. अशा परिस्थितीत फरदीनसोबत बहिणीसोबत पाहून पापाराझींचा चांगलाच गैरसमज झाला.

फरदीन खानने नुकतेच 'हिरामंडी' या वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात कमबॅक केले आहे. तसेच त्याने 'खेल खेल में' आणि 'हाऊसफुल ५' सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या बहिणीसोबतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी फरदीनच्या शांत स्वभावाचे कौतुक केले आहे. फरदीन लवकरच रितेश देशमुखसह आगामी ऐतिहासिक सिनेमात झळकणार आहे.

Web Title : फरदीन खान ने पैपराजी को बताया: 'ये मेरी पत्नी नहीं हैं!'

Web Summary : फरदीन खान ने एक महिला के साथ तस्वीरें खिंचवाने के बाद पैपराजी को स्पष्ट किया कि वह उनकी बहन है, पत्नी नहीं। उन्होंने मीडिया द्वारा उनके रिश्ते को गलत बताने पर भ्रम को दूर किया। खान ने हाल ही में 'हीरामंडी' से वापसी की है।

Web Title : Fardeen Khan clarifies woman's identity to paparazzi: 'Not my wife!'

Web Summary : Fardeen Khan, after being photographed with a woman, clarified to paparazzi that she is his sister, not his wife. He addressed the confusion, correcting media outlets misreporting their relationship. Khan recently made a comeback with 'Heeramandi'.