कमी बजेट पण गाणं ठरलं सुपरहिट; फराह खानने सांगितला 'शीला की जवानी' गाण्याच्या शूटिंगचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 14:07 IST2025-05-31T14:01:23+5:302025-05-31T14:07:27+5:30
"करिअरमधील लो-बजेट गाणं...", कतरिना कैफच्या 'शीला की जवानी' बद्दल फराह खान असं का म्हणाली?

कमी बजेट पण गाणं ठरलं सुपरहिट; फराह खानने सांगितला 'शीला की जवानी' गाण्याच्या शूटिंगचा किस्सा
Farah Khan: फराह खान (Farah Khan) हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. फराह खानचा विनोदी स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा अनेकांना भावतो. कोरिओग्राफर असलेल्या फराह खानने तिच्या आजवरच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक बऱ्याच चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. 'कुछ कुछ होता है', 'ओम शांती ओम' असे तिचे चित्रपट चांगलेच गाजले. या शिवाय फराहने काही सुपहिट गाणी देखील कोरिओग्राफ केली आहेत. त्यातीलच एक गाणं म्हणजे 'शीला की जवानी'. अलिकडेच फराह खानने हे गाणं तिच्या कारकिर्दीतील सर्वात स्वस्त गाणं होतं, असं म्हटलं आहे.
अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर मध्ये "तीस मार खान" हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी चित्रपटातील 'शीला की जवानी' हे गाणं खूप लोकप्रिय झालं. फराहने कतरिना कैफवर चित्रित केलेल्या या गाण्याला अनेक पुरस्कार मिळाले. अशातच तिने या गाण्याबद्दल एक खुलासा केला आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवर तिने 'शीला की जवानी' हे गाणं सर्वात स्वस्त गाणं असल्याचं म्हटलं आहे. त्या गाण्याचा किस्सा शेअर करताना ती म्हणाली,"जर कोणी मला म्हटलं की, त्यांनी त्यांच्या चित्रपटातील गाणं मोठ्या बजेटमध्ये बनवलं आहे, तर मला त्याचं काही अप्रूप वाटत नाही. मला असं वाटतं जितकं तुमचं बजेट असेल त्यापेक्षा तुम्ही कितीतरी चांगल्या पटीने विचार करु शकाल."फराह खानच्या या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.
पुढे याच गाण्याच्या शूटिंगचा किस्सा सांगत ती म्हणाली, "आमच्याकडे या गाण्याच्या शूटसाठी सेटही नव्हता. आमच्याकडे फक्त १० डान्सर्स होते. त्यामुळे आम्ही संपूर्ण गाण्याचं शूट हे फक्त साडेतीन दिवसांत पूर्ण केलं. हे माझ्या कारकिर्दीतील सर्वात कमी बजेट असलेलं आणि सुपरहिट गाणं राहिलं आहे." असा खुलासा फराह खानने केला.