Ask SRK : 'शाहरुख, तुझा व्हॉट्सअॅप नंबर दे; चाहतीच्या ट्विटवर शाहरुख खानचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 13:09 IST2022-12-18T13:05:52+5:302022-12-18T13:09:32+5:30

शाहरुखचा शर्टलेस अवतार पाहून एका चाहतीने शाहरुखला थेट त्याचा व्हॉट्सअॅप नंबरच मागितलाय.

fan-asked-shahrukh-khan-his-whatsapp-no-in-reply-shahrukh-says-i-am-phone-and-message-unfriendly | Ask SRK : 'शाहरुख, तुझा व्हॉट्सअॅप नंबर दे; चाहतीच्या ट्विटवर शाहरुख खानचं भन्नाट उत्तर

Ask SRK : 'शाहरुख, तुझा व्हॉट्सअॅप नंबर दे; चाहतीच्या ट्विटवर शाहरुख खानचं भन्नाट उत्तर

पठाण (Pathaan) या आपल्या आगामी सिनेमातून शाहरुख (Shahrukh Khan) ३ वर्षांनंतर चाहत्यांसमोर येतोय. ३ वर्षांची सगळी कसरच शाहरुखने या सिनेमातुन भरुन काढलेली दिसते. पठाण मधील बेशरम रंग गाण्यात जितकी दीपिकाच्या बोल्ड लुकची चर्चा झाली तितकीच शाहरुखच्याही बोल्डनेसची चर्चा होत आहे. त्याचा शर्टलेस अवतार पाहून तर थेट एका चाहतीने शाहरुखला त्याचा व्हॉट्सअॅप नंबरच मागितलाय.

चाहतीने मागितला नंबर तर शाहरुख म्हणतो...

शाहरुख ट्विटरवर  #AskSRK हे सेशन घेत असतो. यात तो चाहत्यांना रिप्लाय करत असतो. त्यामुळे चाहतेही अनेक भन्नाट प्रश्न विचारतात आणि शाहरुख त्यांना जशास तसे उत्तर देतो. तर एका चाहतीने ट्विट करत शाहरुखला थेट त्याचा व्हॉट्सअॅप नंबरच मागितला. पठाण मधला शाहरुख खानचा लुक बघून ती घायाळ झाली असावी. शाहरुख खान काय नंबर देईल का हे माहित असतानाही तिने थेट नंबर मागितलाच.

यावर शाहरुखनेही नम्रपणे जे खरे आहे ते सांगितले. शाहरुख म्हणाला मी फोन आणि मेसेज फ्रेंडली नाहीए. या उत्तरामुळे चाहती नक्कीच निराश झाली असणार मात्र शाहरुख खानने रिप्लाय तरी दिला यातच तिने धन्यता मानली.

पठाण हा सिनेमा २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. मात्र रिलीजआधीच पिक्चर बॉयकॉट करण्याची मागणी होऊ लागली आहे. पठाण हे नाव, बेशरम रंग गाण्यातली भगवी बिकीनी यामुळे पठाण रिलीजच होऊ देणार नाही अशी धमकीच अनेक संघटनांनी दिली आहे.

Web Title: fan-asked-shahrukh-khan-his-whatsapp-no-in-reply-shahrukh-says-i-am-phone-and-message-unfriendly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.