रणबीर कपूरच्या सिनेमात एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोणची एन्ट्री, अभिनेत्यासोबत देणार बोल्ड सीन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 18:34 IST2025-04-05T18:33:43+5:302025-04-05T18:34:25+5:30

Deepika Padukone And Ranbir Kapoor: संजय लीला भन्साळी यांचा आगामी सिनेमा 'लव्ह अँड वॉर'च्या बाबतीत चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान या चित्रपटात रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण दिसणार असल्याची शक्यता आहे.

Ex-girlfriend Deepika Padukone to enter Ranbir Kapoor's film, will she have a bold scene with the actor? | रणबीर कपूरच्या सिनेमात एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोणची एन्ट्री, अभिनेत्यासोबत देणार बोल्ड सीन?

रणबीर कपूरच्या सिनेमात एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोणची एन्ट्री, अभिनेत्यासोबत देणार बोल्ड सीन?

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा आगामी सिनेमा 'लव्ह अँड वॉर' (Love And War)च्या बाबतीत चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट (Alia Bhatt) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात या तिघांमध्ये लव्ह ट्रँगल पाहायला मिळू शकते. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. या चित्रपटात रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण (Deepika Padukone) दिसणार असल्याची शक्यता आहे. त्या दोघांचे सिनेमात बोल्ड सीन असल्याचेही सांगितले जात आहे.

फिल्मी शिल्मीच्या रिपोर्ट्सनुसार, संजय लीला भन्साळी यांच्या लव्ह अँड वॉर या बहुप्रतिक्षित चित्रपटात रणबीर कपूरसोबत ४० मिनिटांच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी दीपिकाशी संपर्क साधण्यात आला आहे. या पात्रात तिच्या आणि रणबीरमध्ये काही रोमँटिक सीन असू शकतात, ज्यामुळे चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र मिळू शकते. दीपिकाने हा चित्रपट अजून साइन केलेला नाही. ती या बोल्ड आणि आव्हानात्मक भूमिकेचा विचार करत असून लवकरच निर्णय घेऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

लव्ह अँड वॉर सिनेमा पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. पॅन इंडिया चित्रपट साउथ इंडस्ट्रीतील दिग्दर्शक आणि अभिनेत्यांना घेऊन बनवले जातात, परंतु यावेळी संपूर्ण टीम बॉलिवूडची आहे. बाहुबली आणि आरआरआर सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपट देखील देशभरात आवडेल अशी आशा निर्मात्यांना आहे.

वर्कफ्रंट
रणबीर कपूर शेवटचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'ॲनिमल'मध्ये दिसला होता आणि आता 'लव्ह अँड वॉर'मधील त्याच्या लूक आणि व्यक्तिरेखेसाठी तो चर्चेत आहे. आलिया भट नुकतीच जिगरामध्ये दिसली होती, लव्ह आणि वॉर व्यतिरिक्त ती स्पाय युनिव्हर्स अल्फा सिनेमामध्ये सामील होणार आहे. सध्या तरी दीपिकाच्या 'लव्ह अँड वॉर'मधील एंट्रीबाबत कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हा सिनेमा २०२६मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

Web Title: Ex-girlfriend Deepika Padukone to enter Ranbir Kapoor's film, will she have a bold scene with the actor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.