घटस्फोटाच्या १८ महिन्यांनंतर लोकप्रिय अभिनेत्री एक्स पतीसह पुन्हा एकत्र, फोटो पाहून चाहते खूश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 10:05 IST2025-10-07T10:01:55+5:302025-10-07T10:05:25+5:30
घटस्फोटाच्या १८ महिन्यांनंतर लोकप्रिय अभिनेत्री एक्स पत्नीसह पुन्हा एकत्र दिसली.

घटस्फोटाच्या १८ महिन्यांनंतर लोकप्रिय अभिनेत्री एक्स पतीसह पुन्हा एकत्र, फोटो पाहून चाहते खूश!
Esha Deol With Ex-husband Bharat Takhtani: अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol) आणि पती भरत तख्तानीचा (Bharat Takhtani) गेल्या वर्षी घटस्फोट झाला. त्यांचा १२ वर्षांचा संसार मोडला. त्यांना दोन मुली आहेत. ईशा आणि भरतच्या घटस्फोटानंतर दोघांच्या चाहत्यांना आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. पण, अशातच घटस्फोटाच्या १८ महिन्यांनंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसली आहे. दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ईशा आणि भरत यांचा एकमेंकासोबत वेळ घालवतानाचा फोटो समोर आला आहे. विशेष म्हणजे भरत तख्तानीने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ईशा देओलसोबतचा हा फोटो पोस्ट केला आहे. दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत ईशाची बहीण अहाना देओल देखील आहे. फोटो शेअर करत भरतने कॅप्शनमध्ये "फॅमिली संडे" (Family Sunday) असे लिहून हार्ट इमोजी पोस्ट केलं.
भरतचे दुसऱ्या महिलेशी संबंध?
ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचे लग्न २०१२ मध्ये झाले होते आणि त्यांना दोन मुली आहेत. १२ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. रिपोर्ट्सनुसार, ईशाच्या घटस्फोटामुळे तिचे वडील धर्मेंद्र यांना खूप दुःख झाले होते आणि ते मुलीच्या या निर्णयावर नाखूष होते. या घटस्फोटाचे कारण भरतचे दुसऱ्या महिलेशी असलेले संबंध होते, अशाही चर्चा होत्या. विशेष म्हणजे, काही काळापूर्वी भरतने मेघना लखानीसोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामुळे त्यांच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या.
खरंच ईशा आणि भरत पुन्हा आले एकत्र?
एकीकडे भरतच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे माजी पत्नी ईशासोबतचा हा 'फॅमिली संडे'चा फोटो पाहून काही चाहते गोंधळून गेले आहेत. तर काहींनी दोघांना पुन्हा एकत्र पाहून आनंद व्यक्त केलाय. ईशा आणि भरतचा घटस्फोट झाला असला तरी, त्यांनी त्यांच्या दोन मुलींना एकत्र वाढवण्याचा (Co-parenting) निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मुलींसाठी ही भेट झाली असावी, असा कयासही काही चाहत्यांनी लावला आहे.