"तुमचे पैसे परत घ्या...", बिग बजेट सिनेमा फ्लॉप झाला अन् अक्षयने केलेलं असं काही...; 'त्या' कृतीने भारावलेली एकता कपूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 11:34 IST2026-04-07T11:31:41+5:302026-04-07T11:34:05+5:30

सिनेमाचं अपयश जिव्हारी लागलं! निर्मात्यांचं नुकसान पाहून अक्षय कुमारने घेतलेला मोठा निर्णय, एकता कपूरने सांगितला 'तो' किस्सा 

ekta Kapoor reveals about akshay kumar returned cheque after the once upon a time in mumbai dobara failure says | "तुमचे पैसे परत घ्या...", बिग बजेट सिनेमा फ्लॉप झाला अन् अक्षयने केलेलं असं काही...; 'त्या' कृतीने भारावलेली एकता कपूर 

"तुमचे पैसे परत घ्या...", बिग बजेट सिनेमा फ्लॉप झाला अन् अक्षयने केलेलं असं काही...; 'त्या' कृतीने भारावलेली एकता कपूर 

Ekta Kapoor On Akshay Kumar: गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत अक्षय कुमारच्या भूत बंगला या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अभिनेता अक्षय कुमार १४ वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. येत्या १७ एप्रिलपासून हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. नुकताच काल ६ एप्रिल रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.या ट्रेलर लाँन्च दरम्यान, निर्मिती एकता कपूरने खिलाडी कुमारबद्दल एक खास किस्सा शेअर केला.

अलिकडेच मुंबईत पार पडलेल्या 'भूत बंगला'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान एकता कपूरने काही आठवणी सांगितल्या.  'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा'या  चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे  निर्मात्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन कार्तिकने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. ज्यामुळे एकता कपूरला आश्चर्याचा धक्का बसला होता.  त्यावेळी एकता कपूर म्हणाली," हे फार कमी लोकांना माहीत आहे.त्याने मला एक चेक दिला आणि म्हणाला, हे तुमचे पैसे आहेत. तुमचे नुकसान झाले आहे.हे पैसे परत घ्या.आणि मला धक्काच बसला. असं कोणीच करत नाही.माझ्या ३१ वर्षांच्या कारकिर्दीत असं कोणीही केलेलं नाही.

मात्र, एकता कपूरने अक्षयकडून ते मानधनाचे पैसे परत घेण्यास नकार दिला. त्याऐवजी अक्षयने आपल्या आणखी एका प्रोजेक्टमध्ये काम करावं, अशी इच्छा तिने व्यक्त केली. त्याबद्दल बोलताना एकता म्हणाली, "मी त्याला स्पष्टपणे सांगितलं, तू माझ्यासाठी एक चित्रपट कर. जर तू माझ्यासोबत चित्रपट केलास, तर मी खूप पैसे कमवेन.अखेर तो चित्रपट बनला."

दरम्यान, हॉरर कॉमेडी जॉनर असलेला भूत बंगला हा सिनेमा लवकरच थिएटरमध्ये रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं आहे. चित्रपटात अक्षय कुमारसह वामिका गब्बी, राजपाल यादव, परेश रावल, असरानी आणि तब्बू यांसारखे मातब्बर कलाकार आहेत.

Web Title : फिल्म फ्लॉप होने पर अक्षय कुमार का कदम, एकता कपूर हैरान।

Web Summary : फिल्म 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' के फ्लॉप होने पर अक्षय कुमार ने एकता कपूर को अपनी फीस वापस करने की पेशकश की, जिससे वह हैरान रह गईं। एकता ने मना कर दिया और इसके बजाय उनके साथ एक और फिल्म करने को कहा। अब वे 'भूत बंगला' में साथ काम कर रहे हैं।

Web Title : Akshay Kumar's gesture after film flop surprised Ekta Kapoor.

Web Summary : Akshay Kumar offered to return his fee after 'Once Upon a Time in Mumbai Dobaara' flopped, surprising Ekta Kapoor. She refused, asking him to do another film with her instead. They are now working together on 'Bhoot Bungla'.