'एक दिवाने की दिवानियत'च्या यशानंतर हर्षवर्धन राणेला लागली लॉटरी! बॉलिवूडच्या 'या' अॅक्शन हिरोसोबत झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:40 IST2025-11-07T12:30:53+5:302025-11-07T12:40:47+5:30
'एक दिवाने की दिवानियत'च्या च्या यशानंतर हर्षवर्धन राणेचं चमकलं नशीब!'या' सुपरहिट फ्रॅंचायजीचा होणार भाग

'एक दिवाने की दिवानियत'च्या यशानंतर हर्षवर्धन राणेला लागली लॉटरी! बॉलिवूडच्या 'या' अॅक्शन हिरोसोबत झळकणार
Harshvardan Rane New Film: 'सनम तेरी कसम' या चित्रपटामधून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे हर्षवर्धन राणे. त्यानंतर आता मोठ्या ब्रेकनंतर हर्षवर्धन एका रोमॅन्टिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एक दिवाने कि दीवानियत मधून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात तो पुन्हा एकदा यशस्वी ठरला आहे. या चित्रपटात पंजाब दी कुडी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम बाजवा देखील मुख्य भूमिकेत आहे. सोनम-हर्षवर्धनची ही फ्रेश जोडी प्रेक्षकांची पसंतीस उतरली आहे. या चित्रपटानंतर आता हर्षवर्धनचं नशीब फळफळलं आहे.
'एक दिवाने की दीवानियत'च्या यशानंतर प्रसिद्धीझोतात आलेल्या हर्षवर्धन राणेच्या आगामी प्रोजेक्टबद्दची माहिती समोर आली आहे. एक दिवाने की दीवानियत नंतर अभिनेत्याची थेट फोर्स फ्रंचाईजीमध्ये एन्ट्री झाली आहे.कायम रोमॅन्टिक भूमिकेत दिसणारा हर्षवर्धन आता अॅक्शन चित्रपटामध्ये झळकणार आहे. दरम्यान, स्वत हर्षवर्धन राणेने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली होती.या चित्रपटात तो बॉलिवूडचा अॅक्शन हिरो जॉन अब्राहमसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता वाढली आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, 'फोर्स ३' च्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक भाव धुलिया यांच्या खांद्यावर आहे. ते 'खाकी - द बिहार चॅप्टर' सारख्या वेब सिरीजसाठी आजही ओळखले जातात.
कधी रिलीज होणार?
२०११ मध्ये फोर्स फ्रॅंचायजीचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याचबरोबर २०१६ मध्ये या चित्रपटाचा सीक्वल बनवण्यात आला. आता जवळपास ९ वर्षानंतर फोर्स सिनेमाचा तिसरा भाग येणार असल्याचं म्हटलं जातंय. सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, 'फोर्स -३' २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.