"करण जोहर, भन्सालींकडून मला..."; अभिनेते गजराज राव यांनी सांगितलं बॉलिवूडचं वास्तव, म्हणाले-

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 18:53 IST2025-03-12T18:51:58+5:302025-03-12T18:53:25+5:30

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते गजराज राव यांनी करण जोहर, संजय लीला भन्सालींविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे

dupahiya actor gajraj rao talk about sanjay leela bhansali karan johar rohit shetty | "करण जोहर, भन्सालींकडून मला..."; अभिनेते गजराज राव यांनी सांगितलं बॉलिवूडचं वास्तव, म्हणाले-

"करण जोहर, भन्सालींकडून मला..."; अभिनेते गजराज राव यांनी सांगितलं बॉलिवूडचं वास्तव, म्हणाले-

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते गजराज राव यांना आपण गेल्या काही महिन्यांपासून अनेक सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. गजराज राव यांनी 'ब्लॅक फ्रायडे', 'बधाई हो', 'शुभ मंगल ज्यादा सावधान', 'मैदान' यांसारख्या सिनेमांंमध्ये अभिनय करताना पाहिलंय. गजराज राव गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमध्ये अनेक छोट्या तरीही लक्षवेधी भूमिकांमध्ये झळकत आहेत. गजराज राव यांनी एका मुलाखतीत इतकी वर्ष बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर त्यांना आलेला अनुभव शेअर केलाय.

गजराज राव यांनी सांगितलं बॉलिवूडचं वास्तव

गजराज राव यांनी फीव्हर एफ.एम.ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "मी आजवर जिथे खूप गर्दी आणि घाईगडबड असेल तिथून दूर निघून जातो. मी कासव बनण्यामध्ये आनंदी आहे. मला ससा बनण्याची काही इच्छा नाही. डोक्याला कसलाही त्रास घेतलेला मला आवडत नाही. काही वर्षांपूर्वी मी अनेक बड्या मेकर्सना अप्रोच करण्याचा प्रयत्न केला. करण जोहर, संजय लीला भन्साली, रोहित शेट्टी यांसारख्या बिग बजेट दिग्दर्शकांकडे मला काम का मिळत नाही असा विचार मी केला."

"या सर्व गोष्टींवर मला माझ्या बायकोने खूप चांगलं सांगितलं. ती म्हणाली की, गजराज राव हा व्यक्ती या बड्या दिग्दर्शकांच्या रडारमध्ये नाहीये. करण जोहरच्या रडारमध्ये मी नाहीये. त्यांची दुनिया वेगळी आहे आणि त्या दुनियेत वेगळे कलाकार आहेत. मी अशा फिल्ममेकर्सचा विचार केला पाहिजे ज्यांना माझ्यासोबत काम करायची इच्छा आहे. तेच फिल्ममेकर्सना माझ्या दृष्टीने भन्साली आणि करण जोहर आहेत."

Web Title: dupahiya actor gajraj rao talk about sanjay leela bhansali karan johar rohit shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.