Don 3:"मी कोणतेही पैसे घेतले नाही...", ४० कोटींच्या नुकसान भरपाईवरून वाद, रणवीर सिंह म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:13 IST2026-02-12T13:09:21+5:302026-02-12T13:13:15+5:30
"शाहरुख असता तर…",'डॉन ३'च्या निर्मात्यांची नुकसान भरपाईची मागणी;रणवीरचं सडेतोड उत्तर

Don 3:"मी कोणतेही पैसे घेतले नाही...", ४० कोटींच्या नुकसान भरपाईवरून वाद, रणवीर सिंह म्हणाला...
Don 3 Controversy: बॉलिवूडचा धुरंधर अभिनेता रणवीर सिंह मागील बऱ्या दिवसांपासून डॉन-३ चित्रपटामुळे चर्चेत आहे. फरान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटातून रणवीरने एक्झिट घेतल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. धुरंधरच्या यशामुळे रणवीर सिंहने हा सिनेमा सोडल्याच्या चर्चा होत्या.मीडिया रिपोर्टनुसार, यामुळे फरहान अख्तरच्या प्रोडक्शन कंपनीने रणवीरकडे ४० कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यावर रणवीरची प्रतिक्रिया समोर आली आहे.
साल २०२३ मध्ये जेव्हा 'डॉन ३'ची घोषणा करण्यात आली. यावेळी रणवीर सिंहला मुख्य भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलं. जवळपास तीन वर्ष या चित्रपटाबाबत कोणतीही अपडेट नसल्याने 'डॉन ३' थंडबस्त्यात गेला की काय अशा चर्चा जोर धरू लागल्या. रणवीरने काही क्रिएटिव्ह डिफरन्समुळे डॉन ३ मधून एक्झिट घेतल्याची माहिती मिळते आहे.
फरहान अख्तर काय म्हणाला...
फरहान अख्तरने केलेल्या दाव्यानुसार, डॉन -३च्या प्री प्रोडक्शनसाठी खूप पैसे खर्च करण्यात आले. त्यामुळे या नुकसान भरपाईसाठी त्याने रणवीरकडे ४० कोटी रुपयांची मागणी केली आहे. तर दुसरीकडे आपण या नुकसानीला जबाबदार नाही, असं रणवीरने स्पष्ट केलं आहे. दरम्यान,या प्रकरणी निर्माते आणि त्याच्यामध्ये चर्चा सुरु आहे. यावेळी प्रोड्यूसर्स आणि गिल्ड ऑफ इंडियासोबत झालेल्या चर्चेत रणवीरने हा मुद्दा उपस्थित केला. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, आपण निर्मात्यांकडून कोणतेही पैसे घेतले नसून त्यांचा संपूर्ण खर्च हा चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनवर झाला आहे.
रणवीरने आपली बाजू मांडली...
या चर्चेदरम्यान, रणवीरने सांगितलं की, संजय लिला भन्साळींच्या बैजू बावरा चित्रपटातील चॅलेंजिंग भूमिकेसाठी प्रचंड मेहनत सुरु होती.यामुळे काही बिग बिजेट प्रोजेक्ट्स त्याने नाकारले. मात्र, काही कारणास्तव हा प्रोजेक्ट रखडला. त्यानंतर संजय यांनी लव्ह अॅंड वॉर सिनेमावर काम करणं सुरु केलं. यामध्ये आलिया भट्ट, विकी कौशल अशी स्टारकास्ट आहे. यादरम्यान त्याने केलेल्या तयारीसाठी त्याला कोणतीही भरपाई मिळाली नाही. बऱ्याचदा काही प्रोजेक्ट्स हे बंद पडतात. पुढे ढकळले जातातं. त्याची कोणालीह भरपाई मिळत नाही.
शिवाय या चित्रपटासाठी शाहरुख खानला घेण्याची चर्चा सुरु आहे.यावर अभिनेता म्हणाला,'शाहरुखने डॉन-३ साठी होकार दिला असता तर त्याला कोणत्याही भरपाईशिवाय रिप्लेस करण्यात आलं असतं. त्यामुळे प्रोड्यूसरला ४० कोटी देण्याची जबाबदारी आपली नाही,'असं त्याने स्पष्ट केलं.