लग्नानंतर तुला माझ्या आई-बाबांपासून वेगळं राहायचंय का? पतीने विचारलेल्या प्रश्नावर सोनाक्षी म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:26 IST2025-11-04T12:26:01+5:302025-11-04T12:26:49+5:30
सोनाक्षी सिन्हाला लग्नानंतर वेगळं राहायचं होतं का? अभिनेत्रीने दिलेल्या उत्तराने जिंंकलं सर्वांचं मन

लग्नानंतर तुला माझ्या आई-बाबांपासून वेगळं राहायचंय का? पतीने विचारलेल्या प्रश्नावर सोनाक्षी म्हणाली-
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नानंतर आता सोनाक्षीने त्यांच्या नात्याबद्दल एक मजेशीर आणि भावनिक अनुभव सांगितला आहे. लग्नाआधी झहीरने तिला विचारले होते की, लग्नानंतर तिला त्याच्या आई-वडिलांसोबत राहायचे आहे का की वेगळं घर घ्यायचं आहे. यावर सोनाक्षीने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.
सोनाक्षीला झहीरच्या आई-बाबांसोबत राहायचं होतं?
झहीरने विचारलेल्या या प्रश्नावर सोनाक्षीने हसतच उत्तर दिलं – “नाही, मी सगळ्यांसोबतच राहणार. जर तुला वेगळं राहायचं असेल तर तू राहू शकतोस.” तिचं हे उत्तर ऐकून झहीर देखील आनंदी झाला आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यात आला. सोनाक्षीने पुढे सांगितले की, तिचे सासरचे लोक खूपच प्रेमळ आहेत. घरातले वातावरण अगदी आनंदी आणि एकत्र राहण्यासारखे आहे. ती म्हणाली की, “आम्ही सगळे मिळून वेळ घालवतो, एकत्र फिरायला आणि सुट्ट्यांवर जातो.”
सोनाक्षीने हसत आणखी एक गोष्ट सांगितली की, “माझ्या सासूबाईंना आणि मला दोघींनाही स्वयंपाक करता येत नाही. त्यांनी मला मजेत सांगितलं – ‘तू बरोबर घरात आली आहेस!’” या वक्तव्यानंतर सोनाक्षी आणि झहीर यांच्या नात्यातील गोडी आणि समजूतदारपणा पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरेत भरला आहे. झहीरच्या घरच्यांनी सोनाक्षीला आपलंसं केलं आहे. त्यामुळेच त्यांच्यापासून वेगळं न राहता सोनाक्षीने झहीरच्या आई-बाबांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनी अभिनेत्रीच्या समजूतदारपणाचं कौतुक केलं आहे.