दीपिका पादुकोण व कतरिना कैफच्या मैत्रीतील दुरावा या व्यक्तीमुळे होतोय दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 11:40 IST2018-12-11T11:40:05+5:302018-12-11T11:40:46+5:30

कतरिना कैफ व दीपिका पादुकोण यांच्या मैत्रीतील दुरावा रणबीर कपूरमुळे निर्माण झाला होता. मात्र आता एका व्यक्तीमुळे त्यांच्यात पुन्हा मैत्री होताना दिसते आहे.

Dipa Padukone and Katrina Kaif's friendship are due to the distraught distant person | दीपिका पादुकोण व कतरिना कैफच्या मैत्रीतील दुरावा या व्यक्तीमुळे होतोय दूर

दीपिका पादुकोण व कतरिना कैफच्या मैत्रीतील दुरावा या व्यक्तीमुळे होतोय दूर

ठळक मुद्देकतरिना व दीपिका यांच्यात होतेय मैत्री


दीपिका पादुकोणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरने कतरिना कैफला डेट करायला सुरूवात केली तेव्हा दीपिका व कतरिनाची मैत्रीत दुरावा आला. दोघीही एकमेकांना अजिबात पसंत करत नाहीत. तसेच चॅट शोमध्ये एक दुसऱ्यांवर कमेंट करताना दिसल्या आहेत. मात्र आता त्या दोघी एकमेकींमधल्या मतभेद विसरून फ्रेंडशिप केली आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिकाने आधी सांगितले होते की कतरिनाला रिसेप्शनला बोलवणार नाही. मात्र रणवीर सिंगने पर्सनली कतरिनाला निमंत्रण दिले आणि कतरिनाने निमंत्रण स्वीकारले देखील व तिने रिसेप्शनला हजेरी लावली. दीपिका व कतरिनाच्या कॅटफाईटमुळे त्या दोघी नेहमी चर्चेत असत. मात्र आता कतरिनाने रिसेप्शनला हजेरी लावून दीपिकाच्या मनात जागा निर्माण केली आहे.

कतरिनाने या रिसेप्शनमध्ये खूप मजा केली आणि दीपवीरचे खूप कौतूक केले. रिसेप्शननंतर दीपिकाने कतरिनाचे फोटो लाईक केले व दोघींनीही इंस्टाग्रामवर फॉलो करायला सुरूवात केली. एवढेच नाही तर कतरिनाने रणवीर व दीपिकाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कमेंट करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या दोघींमध्ये मैत्री झाल्यामुळे त्या दोघींचे चाहते खूप खूश झालेत.


अभिनेत्री कतरिना कैफचा झिरो सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरूख खान व अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. तसेच कतरिना सलमान खानसोबत भारत चित्रपटात झळकणार आहे. तर दीपिका पादुकोण लग्नानंतर मेघना गुलजार दिग्दर्शित अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी हिच्या आयुष्यावर आधारीत चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. 

Web Title: Dipa Padukone and Katrina Kaif's friendship are due to the distraught distant person