ब्रह्मास्त्रमध्ये नागार्जुनच्या अपोझिट झाली 'या' अभिनेत्रीची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 14:10 IST2018-07-17T13:38:12+5:302018-07-17T14:10:38+5:30

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचे शूटिंग सध्या बल्गेरियामध्ये सुरु आहे. बल्गेरियामधल्या सोफिया शहरात या सिनेमाच्या दुसऱ्या शेड्युलचे शूटिंग सुरु आहे.

Dimple Kapadia will be in bramhastra opposite nagarjun | ब्रह्मास्त्रमध्ये नागार्जुनच्या अपोझिट झाली 'या' अभिनेत्रीची एंट्री

ब्रह्मास्त्रमध्ये नागार्जुनच्या अपोझिट झाली 'या' अभिनेत्रीची एंट्री

ठळक मुद्देनागार्जुननंतर आता आणखीन एका प्रसिद्ध कलाकाराची यात एंट्री होणार आहेअयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमात आपल्याला भरपूर अॅक्शन दिसणार आहे

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचे शूटिंग सध्या बल्गेरियामध्ये सुरु आहे. बल्गेरियामधल्या सोफिया शहरात या सिनेमाच्या दुसऱ्या शेड्युलचे शूटिंग सुरु आहे. ब्रह्मास्त्रची संपूर्ण टीम सध्या बल्गेरियामध्ये आहे. नुकतेच नागार्जुनने या टीमला ज्वाइन केले आहे.   


यासिनेमात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका होत्या त्यानंतर यात साऊथचा सुपरस्टार नागार्जुनची देखील एंट्री झाली. करण जोहरने सोशल मीडियावर स्वत: ही माहिती दिला. नागार्जुननंतर आता आणखीन एका प्रसिद्ध कलाकाराची यात एंट्री होणार आहे. नागार्जुनच्या अपोझिट डिंपल कपाडिया दिसणार आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार सिनेमाच्या टीमला बल्गेरियात लवकरच डिंपलदेखील ज्वाईन करणार आहे. तीन वर्षानंतर डिंपल सिल्वर स्क्रिनवर पदार्पण करतेय. शेवटची डिंपल 'वेलकम बॅक' आणि 'फाइंडिंग फैनी'मध्ये दिसली होती. 


अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमात आपल्याला भरपूर अॅक्शन दिसणार आहे. हा सिनेमा तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. मौनी या चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. रणबीरच्या रस्त्यात अडचणी टाकण्याचे काम करणार आहे. करण जोहराचा धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या सोशल मीडियावर सिनेमातील स्टारचे फोटो ट्रेंडिंग होताना दिसतायेत. यासिनेमासाठी रणबीरने घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले आहे. तर ब्रह्रास्त्रच्या पहिल्या शेड्युलच्या शूटिंगदरम्यान आलियाला दुखापत झाली होती. त्यानंतर तिने दोन दिवस आराम करुन पुन्हा शूटिंग सुरु केली होती.   

Web Title: Dimple Kapadia will be in bramhastra opposite nagarjun