कुरळे केस, गोबरे गाल! या चिमुकलीला ओळखलंत का?, आज आहे बॉलिवूडची स्टार, पतीही सुपरस्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 20:00 IST2023-05-15T19:40:10+5:302023-05-15T20:00:15+5:30
Guess Who: गोल चेहरा आणि कुरळे केस असलेल्या या क्युट मुलीला पाहून ती कोणती बॉलीवूड अभिनेत्री आहे हे कोणालाच ओळखता येत नाही.

कुरळे केस, गोबरे गाल! या चिमुकलीला ओळखलंत का?, आज आहे बॉलिवूडची स्टार, पतीही सुपरस्टार
Guess Who:गेलेली वेळ कधीच परत येत नाही, फक्त आठवणीच राहतात! पण काही खास क्षण आपण कॅमेऱ्यात टिपतो. मग जेव्हा जेव्हा ते फोटे समोर येतात तेव्हा तो काळही डोळ्या पुढे उभा राहतो. बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत..
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. त्याचे आवडते कलाकार बालपणी कसे दिसायचे किंवा ते कुठून शिकले, कुठे राहत होता. बॉलीवूडप्रेमींना नेहमीच अशा सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतात.
कोणत्या अभिनेत्रीचा आहे हा फोटो?
सध्या सोशल मीडियावर एका गोंडस चिमुरडीचा फोटो व्हायरल होत आहे. गोल चेहरा आणि कुरळे केस असलेल्या या मुलीला पाहून ती कोणती बॉलीवूड अभिनेत्री आहे हे कोणालाच ओळखता येत नाही. तुम्हाला अजूनही ओळखता येत नसेल, तर आम्ही सांगतो तुम्हाला या मुलीचं नाव. ही मुलगी दुसरी कोणी नसून दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आहे.
दीपिका पादुकोणने शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. दीपिकाने शाहरुखसोबत 'हॅपी न्यू इयर' आणि 'चेन्नई एक्सप्रेस'सह अनेक चित्रपट केले आहेत. शाहरुख खानसोबत आलेला तिच्या 'पठाण' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले.