मुलगा सिकंदर खेरने वडील अनुपम खेर यांना चापट मारली? मजेशीर व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 11:44 IST2026-01-22T11:42:27+5:302026-01-22T11:44:56+5:30
सिकंदर आणि अनुपम खेर यांचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे

मुलगा सिकंदर खेरने वडील अनुपम खेर यांना चापट मारली? मजेशीर व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर आणि त्यांचा मुलगा सिकंदर खेर यांच्यातील नातं सर्वांना माहितच आहे. सोशल मीडियावर हे दोघे अनेकदा मजेशीर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. नुकताच सिकंदर खेरने आपल्या वडिलांसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सिकंदरने वडिलांच्या गालावर चापट मारली असं दिसत आहे. ज्यावर अनुपम खेर यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
नेमकं काय घडलं?
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, अनुपम खेर यांनी नुकतीच आपली एक दाढ काढली आहे, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्याची एक बाजू सुजलेली आहे. तिथे औषध देऊन त्यामध्ये भूल देण्यात आली आहे. सिकंदरने हीच संधी साधत वडिलांची फिरकी घेण्याचे ठरवले. तो आपल्या वडिलांना विचारतो की, "मी या सुजलेल्या भागावर मारले तर तुम्हाला कळेल का?"'
सिकंदर जेव्हा हात जवळ नेतो, तेव्हा अनुपम खेर चिडून पण विनोदी अंदाजात त्याला म्हणतात, "काय करणार आहेस? जर जास्त जोरात लागलं, तर मी उलट्या हाताने तुझ्या नाकावर मारीन आणि तुझं नाक तोडीन." वडिलांनी अशी ताकीद देऊनही सिकंदर थांबत नाही. तो हळूच त्यांच्या गालावर चापट मारतो. हे पाहून अनुपम खेर काहीसे थक्क होतात. सिकंदर पुन्हा एकदा चापट मारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनुपम खेर म्हणतात, "नाही नाही बेटा, असं करत नाहीत. करू नकोस."
सिकंदर मस्ती करायचा थांबत नाही, तेव्हा अनुपम खेर त्यांच्या एका जुन्या चित्रपटातील संवाद बोलून दाखवतात. शेवटी सिकंदर प्रेमाने त्यांच्या गालावरून हात फिरवतो. हा व्हिडिओ शेअर करताना सिकंदरने कॅप्शनमध्ये जावेद अख्तर, बोनी कपूर, अनिल कपूर आणि शेखर कपूर यांचा उल्लेख करत गंमतीने म्हटले की, "खेर साहेबांची दाढ काढल्यानंतरची अवस्था पहा." चाहत्यांना या बाप-लेकाची ही 'केमिस्ट्री' खूप आवडली असून, अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी आणि मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. अनुपम खेर सध्या त्यांच्या आगामी 'खोसला का घोसला २' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.