'किंग' सिनेमात शाहरुखने ब्रॅड पिटचा लूक कॉपी केला? दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने सोडलं मौन, म्हणाला-
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 09:42 IST2025-11-04T09:38:10+5:302025-11-04T09:42:18+5:30
शाहरुख खानचा लूक ब्रॅड पिटच्या सिनेमाशी मिळताजुळता आहे, यावर किंगच्या दिग्दर्शकाने त्याची स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे

'किंग' सिनेमात शाहरुखने ब्रॅड पिटचा लूक कॉपी केला? दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने सोडलं मौन, म्हणाला-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या त्याच्या आगामी 'किंग' सिनेमातील लूकमुळे खूप चर्चेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करतोय. 'किंग' सिनेमातील शाहरुखच्या लूकची तुलना थेट हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिट (Brad Pitt) सोबत केली जात आहे. या तुलनेमुळे सोशल मीडियावर एक नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे सिद्धार्थने या वादावर मौन सोडलं आहे.
काय आहे नेमका वाद?
काही दिवसांपूर्वा हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिटचा 'एफ १' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातील एका सीनसाठी ब्रॅड पिटने जे शर्ट आणि लूक केला होता, तसाच हुबेहूब लूक शाहरुखने 'किंग'साठी केल्याने नेटकऱ्यांनी त्याची तुलना केली आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये नेटकऱ्याने लिहिलं होतं की, "जर बॉलिवूड चित्रपटात जहाज असेल तर ती 'टायटॅनिक'ची कॉपी, जेट असेल तर 'टॉप गन'ची नक्कल आणि आता शर्ट एकसारखा असेल तर 'एफ १' ची कॉपी!" या पोस्टखाली सिद्धार्थने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. एकूणच या तुलनेत काहीच अर्थ नाही हेच सिद्धार्थच्या कमेंटमधून दिसतंय.
Funny logic by haters these days.
— अपना Bollywood🎥 (@Apna_Bollywood) November 3, 2025
If Bollywood movie has:-
Fighter Jet - Copy of Top Gun
Ship - Copy of Titanic
Same dress code - Copy of F1
Orange Dress - Anti-Hindu 😭
Their IQ level is like - buffering since 1947 pic.twitter.com/yHjRTNcjTt
'किंग'चा पहिला प्रोमो तुफान व्हायरल
'किती खून केले, आठवत नाही! लोक चांगले होते का वाईट, माहित नाही! पण त्यांच्या डोळ्यात दिसलं की, त्यांचा हा अखेरचा श्वास आहे. आणि मी त्यामागचं कारण. जगाने मला एकच नाव दिलं ते म्हणजे किंग', असा भन्नाट डायलॉग असलेला 'किंग' सिनेमाचा पहिला प्रोमो आऊट झालाय. 'डर नही दहशत हू', असा डायलॉग प्रोमोच्या शेवटी दिसतो. शाहरुख खानचा अॅक्शन अवतार आणि स्टायलिश लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. अल्पावधीत या टीझरवर प्रेक्षकांनी लाईक्स कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.