अक्षय खन्नाला 'या' अभिनेत्रीने लगावलेली कानशिलात! 'धुरंधर' च्या सेटवर नेमकं काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 18:01 IST2025-12-15T17:59:43+5:302025-12-15T18:01:52+5:30
अभिनेता रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला धुरंधर हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ५ डिसेंबरला रिलीज झाला.

अक्षय खन्नाला 'या' अभिनेत्रीने लगावलेली कानशिलात! 'धुरंधर' च्या सेटवर नेमकं काय घडलेलं?
Dhurandhar Movie: अभिनेता रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला धुरंधर हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ५ डिसेंबरला रिलीज झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे चित्रपटात खलनायक सुद्धा अगदी नायकाच्या तोडीस तोड निवडलेला आहे. रणवीर सिंह हा या चित्रपटाचा अभिनेता असला तरी हा भाग गाजवला तो अक्षय खन्नाने.दरम्यान,या चित्रपटाबरोबरच त्यातील एका सीनची सुद्धा चांगलीच चर्चा होताना दिसतेय. रहमान डकैत बनलेल्या अक्षय खन्नाच्या अभिनेत्री सौम्या टंडन कानशिलात लगावते. परंतु, हे खऱ्या आयुष्यात नसून फक्त सिनेमासाठी तिने केलं होतं.एका मुलाखतीत रेहमान डकैतचा गॅंगमध्ये डोंगाची भूमिका साकारणारा अभिनेता नवीन कौशिकने या सीनचा किस्सा शेअर केला आहे.
अक्षय खन्नाचा ‘छावा’ मधील अंगावर काटे उभे करणारा परफॉर्मन्स आणि ‘धुरंधर’मधील स्पाय-थ्रिलर अंदाज, दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोटींची आतषबाजी केली आहे. दरम्यान, चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक सीन दाखवण्यात येतो. ज्यामध्ये भाभीजी घर पर है फेम अभिनेत्री सौम्या टंडन (उल्फत) रेहमान डकैतच्या (अक्षय खन्ना) कानशिलात लगावते. या सीनमध्ये उल्फत तिच्या मुलाच्या निधनानंतर पूर्णपणे तुटून जाते. हा सीन शूट करताना सौम्याने अभिनेत्याच्या १-२ नव्हे, थेट ७ वेळा कानशिलात लगावली आली होती.
'धुरंधर' मध्ये अक्षय खन्नाचे दोन जवळचे साथीदार होते पहिला उजैर बलोच आणि दुसरा डोंगा. डोंगाची भूमिका अभिनेता नवीन कौशिकने साकारली असून नुकत्याच 'फिल्मीग्यान'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने चित्रपटाच्या शूटिंगचा एक किस्सा शेअर केला आहे. तेव्हा तो म्हणाला, "अक्षय खन्ना यांनी तो सीन परफेक्ट व्हावा यासाठी सारखे रिटेक घेत होते. तो सीन करताना अक्षयला कानशिलात लगावण्यात आली.परंतु, त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. उलट अक्षय खन्ना, आदित्य सरांनी सौम्याला समाजावलं की, समोर कोणी का असेना आपण आपल्या पात्राशी एकरुप व्हायचं. 'उल्फत जी समोर उभ्या असलेल्या रहमानला घाबरत नाही, असं समज'. असा सल्ला त्यांनी सौम्याला दिला होता. "
पुढे तो म्हणाला,"दुसऱ्या भागात तुम्हाला तिचे आणखी काही प्रसंग पाहायला मिळतील. तीच घरात रहमानची काळजी घेते आणि सर्वकाही करते. रेहमानमुळे आणि त्याच्या निर्णयांमुळे उल्फतने आपला मुलगा गमावलेला असतो.म्हणूनच थप्पड मारण्याचा तो क्षण इतका प्रभावी होता.आदित्य सर आणि अक्षय सर यांनी एक खूप चांगला निर्णय घेतला की, जेव्हा थप्पड मारली जाईल, तेव्हा रहमान कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. असा तो सीन होता. "