१७ वर्षांत असं पहिल्यांदाच घडणार! 'धुरंधर' सिनेमा 'इतक्या' तासांचा असणार, आताच जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 09:37 IST2025-11-27T09:36:41+5:302025-11-27T09:37:53+5:30
रणवीर सिंगचा धुरंधर सिनेमाची लांबी ऐकून धक्कच व्हाल. त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरमध्ये पर्वणी मिळणार आहे

१७ वर्षांत असं पहिल्यांदाच घडणार! 'धुरंधर' सिनेमा 'इतक्या' तासांचा असणार, आताच जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याच्या आगामी 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट त्याच्या कथानकासोबतच एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. ते म्हणजे त्याची 'धुरंधर'ची लांबी अर्थात रनटाइम. हा चित्रपट बॉलिवूडमधील गेल्या १७ वर्षांतील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक ठरू शकतो, अशी माहिती समोर येत आहे.
आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाची लांबी तब्बल ३ तास ३२ मिनिटे इतकी असू शकते, अशी शक्यता 'बॉलिवूड हंगामा'च्या एका रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. चित्रपट नक्की किती लांबीचा असणार, हे अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलं नाहीये. कारण सेन्सॉर बोर्डाकडून (CBFC) चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकदा सेन्सॉर बोर्डाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर चित्रपटाची लांबी अधिकृतपणे जाहीर होईल.
कथा मोठी आणि विस्तृत असल्याने, चित्रपटाची लांबी वाढली असल्याचे सांगितले जात आहे. निर्मात्यांना विश्वास आहे की 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' आणि 'आर्टिकल ३७०' सारख्या चित्रपटांप्रमाणे 'धुरंधर'ची कथा देखील प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. एवढेच नाही, तर हा चित्रपट एकाच वेळी दोन भागांमध्ये रिलीज होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
हा चित्रपट जर ३ तास ३२ मिनिटांचा असेल, तर तो २००८ मध्ये रिलीज झालेल्या 'जोधा अकबर'चा (Jodhaa Akbar) विक्रम मोडेल. 'जोधा अकबर'ची लांबी ३ तास ३४ मिनिटे होती. याशिवाय, 'एलओसी कारगिल' (४ तास ०७ मिनिटे), 'लगान' (३ तास ४४ मिनिटे) आणि 'मोहब्बतें' (३ तास ३५ मिनिटे), अॅनिमल (३ तास २१ मिनिटं) हे बॉलिवूडमधील सर्वाधिक लांबीचे चित्रपट राहिले आहेत.
'धुरंधर' हा स्पाई-थ्रिलर ॲक्शन चित्रपट असून, यामध्ये रणवीर सिंगसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर माधवन यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.