सकाळी नाश्ता नाही, २ वेळचं जेवण अन्...; अक्षय खन्नाचा 'धुरंधर' डाएट प्लॅन, 'असं' ठेवतो स्वत:ला फिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:04 IST2026-01-08T12:58:57+5:302026-01-08T13:04:36+5:30
संतुलित आहार अन् नो स्नॅक्स पॉलिसी; 'धुरंधर' फेम अक्षय खन्ना फॉलो करतो 'अशी' दिनश्चर्या, फिटनेस सिक्रेट नेमकं आहे तरी काय?

सकाळी नाश्ता नाही, २ वेळचं जेवण अन्...; अक्षय खन्नाचा 'धुरंधर' डाएट प्लॅन, 'असं' ठेवतो स्वत:ला फिट
Akshaye Khanna Fitness Secreat: 'धुरंधर' चित्रपटामुळे अभिनेता अक्षय खन्नाची सर्वाधिक चर्चा होत आहे. पडद्यावर रेहमान डकैतची खलनायिकाची भूमिका साकारून त्याने सिनेरसिकांच्या मनावर गारुड घातलं. Fa9la गाण्यातील त्याचा डान्स सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.या चित्रपटाने जगभरात जवळपास १२२७ कोटींची कमाई केली आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का वयाच्या पन्नाशीतही प्रभावी स्क्रिन प्रेझेंस ,उत्तम शरीरयष्टी आणि आव्हानात्मक भूमिकांमध्ये जीव ओतण्याची क्षमता असलेल्या धुरंधर अक्षय खन्नाचं फिटनेस सिक्रेट काय आहे? एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्याने याविषयी खुलासा केला आहे.
अक्षय खन्नाने लहानपणापासूनच स्टारडम अनुभवले आहे. आपल्या वडील विनोद खन्ना यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्याने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.अक्षय खन्नाचे व्यक्तिमत्त्व नेहमीच शांत, संयमी आहे.हीच गोष्ट त्याच्या आरोग्य आणि खाण्याच्या सवयींमध्येही स्पष्टपणे दिसून येते.बॉलिवूड हंगामाशी बोलताना अभिनेत्याने त्याचा फिटनेस सिक्रेट सांगितलं होतं. तो म्हणाला, "मी कधीही नाश्ता करत नाही.मी थेट दुपारी जेवतो आणि रात्रीचे जेवण करतो. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या मध्ये मी काहीही खात नाही, अगदी सँडविच किंवा बिस्किटसुद्धा नाही.
असा आहे अभिनेत्याचा डाएट प्लॅन...
अगदी ॲक्शन चित्रपटांचे चित्रीकरण करतानाही तो या 'नो स्नॅक्स पॉलिसी'चे पालन करतो. यावेळी अक्षयने एक गोष्ट आवर्जून सांगितली ती म्हणजे, संध्याकाळ होताच त्याला त्याची चहा हवीच असते, जी तो कधीही चुकवत नाही, आणि तो चहाबरोबर कोणतेही बिस्किटे किंवा बाकी काहीच खात नाही.
अक्षय खन्नाला संतुलित जेवण आवडतं. दुपारच्या जेवणात त्याला डाळ, भात, भाजी आणि नॉनव्हेज पदार्थ किंवा मासे खायला आवडतात.रात्रीच्या जेवणात सहसा साधी पोळी, भाजी आणि नॉनव्हेज असतं. या मुलाखतमीध्ये एक आश्चर्यकारक खुलासा केली होता. आजच्या धावपळीच्या पुरेशी झोप मिळणं अवघडच असतं. मात्र, अक्षय दररोज सुमारे १० तास झोपतो.त्याने हे देखील कबूल केले की त्याला गोड पदार्थ खूप आवडतात.