'धुरंधर'मधली २३ वर्षांची आयेशा खान; साडीतील फोटो पाहून चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "मुझसे शादी करोगी?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:25 IST2025-12-14T15:45:47+5:302025-12-14T17:25:45+5:30
'धुरंधर'मधील गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. या सिनेमातील शरारत गाणं लोकप्रिय ठरत आहे. या गाण्यात आयेशा खान आणि क्रिस्टल डिसुझा या दोघींनी त्यांचा जलवा दाखवला आहे.

'धुरंधर'मधली २३ वर्षांची आयेशा खान; साडीतील फोटो पाहून चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "मुझसे शादी करोगी?"
सध्या जिकडे तिकडे 'धुरंधर' सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेरांच्या कामगिरीवर आणि मिशनवर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमातील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. 'धुरंधर'मधील गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. या सिनेमातील शरारत गाणं लोकप्रिय ठरत आहे. या गाण्यात आयेशा खान आणि क्रिस्टल डिसुझा या दोघींनी त्यांचा जलवा दाखवला आहे.
'धुरंधर'मधील या गाण्यामुळे आयेशा खान चर्चेत आली आहे. आयेशाच्या फॅन फॉलोविंगमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. २३ वर्षीय आयेशाचे ग्लॅमरस फोटो पाहून तर चाहते तिच्या प्रेमातच पडले आहेत. आयेशाने नुकतंच पांढऱ्या साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने तर कमेंट करत आयेशाला थेट लग्नाचीच मागणी घातली आहे.
"आम्ही तुझ्यावर फिदा आहोत", "मैहफिलमध्ये आग लावलीस", "अप्सरा राणी" अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. तर एका चाहत्याने "माझ्याशी लग्न कर", अशी कमेंटही केली आहे.

कोण आहे आयेशा खान?
आयेशा खान ही लोकप्रिय हिंदी अभिनेत्री आहे. बालकलाकार म्हणूनच तिने अभिनयाला सुरुवात केली होती. बालवीर, कसौटी जिंदगी की या मालिकांमध्ये ती दिसली होती. किस किस को प्यार दूँ, ओम भीम बश, जाट या सिनेमांमध्ये ती झळकली आहे. 'धुरंधर'मुळे आयेशा प्रसिद्धीझोतात आली आहे.