'धुरंधर'साठी १ कोटी मिळाले? सोशल मीडियावर चर्चा; अभिनेता म्हणाला, "सगळे पैसे संपले..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 15:18 IST2026-04-10T15:14:03+5:302026-04-10T15:18:33+5:30

आर माधवन म्हणजे अजय सन्यालला धमकावणारा हाच तो जहूर मिस्त्री, अभिनेत्याला सिनेमासाठी मिळाले १ कोटी?

dhurandhar fame actor vivek sinha played role of zahoor mistry received 1 crore fees clarifies rumours | 'धुरंधर'साठी १ कोटी मिळाले? सोशल मीडियावर चर्चा; अभिनेता म्हणाला, "सगळे पैसे संपले..."

'धुरंधर'साठी १ कोटी मिळाले? सोशल मीडियावर चर्चा; अभिनेता म्हणाला, "सगळे पैसे संपले..."

'धुरंधर २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १६०० कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचला आहे. , या चित्रपटातील खलनायक 'जहूर मिस्त्री'ची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक सिन्हा सध्या प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातच विवेकच्या एका डायलॉगने झाली होती. या संवादाने आणि चित्रपटातील त्याच्या "हिंदू खूपच भित्रा समाज आहे" या विधानामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. परिस्थिती इतकी टोकाला गेली की, शेवटी विवेकला स्वतः पोस्ट करत "मी पाकिस्तानी नसून भारतीय अभिनेता आहे," असे स्पष्टीकरण द्यावे लागले.

विवेक सिन्हाच्या मानधनाबाबतही सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या आहेत. काही रिपोर्ट्समध्ये त्याला या भूमिकेसाठी ६० लाख, तर काही ठिकाणी चक्क १ कोटी रुपये मानधन मिळाल्याचे दावे केले जात होते. या अफवांवर अखेर विवेकने मौन सोडले असून त्याने अतिशय मजेशीर आणि प्रामाणिक उत्तर दिले आहे. विवेक म्हणाला की, "भाऊ, मला इतके पैसे मिळालेले नाहीत, खरं सांगतो! कृपया अशा पोस्ट टाकू नका. मला 'धुरंधर'साठी चांगले मानधन मिळाले, जेवढी मला अपेक्षा होती तेवढी रक्कम मिळाली, पण ती  १ कोटी नक्कीच नाही."

मानधनाबाबत पुढे बोलताना विवेकने मुंबईतील महागाईवरही मिश्किल टिप्पणी केली. तो म्हणाला, "जे काही पैसे चित्रपटातून मिळाले होते, ते आता संपले देखील आहेत. मी मुंबईत राहतो आणि इथे राहण्याचा खर्च खूप जास्त आहे, त्यामुळे धुरंधरमधून मिळालेली सर्व कमाई आता संपली आहे." विवेकने स्पष्ट केले की लोकांच्या दाव्यांप्रमाणे त्याच्याकडे आता कोट्यवधी रुपये शिल्लक नाहीत. अफवा पसरवणाऱ्यांना त्याने अशा प्रकारे उत्तर दिलं आहे.

'धुरंधर'च्या पहिल्या भागात विवेकची भूमिका छोटी होती, मात्र पार्ट २ मध्ये त्याच्या व्यक्तिरेखेचा विस्तार करण्यात आला. जेव्हा जसकीरत सिंह रंगीचा मित्र लियारीला पोहोचतो, तेव्हा या पात्राची खरी दहशत पाहायला मिळते. अखेर क्लाइमॅक्सच्या आधी रणवीर सिंहने साकारलेला 'हमजा' या दहशतवाद्याचा त्याच्या घरात घुसून खात्मा करतो. प्रेक्षकांनी या दृश्यावर प्रचंड टाळ्या शिट्ट्या वाजवल्या असून, नकारात्मक भूमिका असूनही विवेक सिन्हाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title : 'धुरंधर' अभिनेता का स्पष्टीकरण, ₹1 करोड़ नहीं मिले, पैसे खत्म हो गए।

Web Summary : 'धुरंधर 2' में भूमिका के लिए ट्रोल हुए अभिनेता विवेक सिन्हा ने ₹1 करोड़ मिलने से इनकार किया। उन्होंने स्पष्ट किया कि उन्हें अच्छा भुगतान मिला, लेकिन इतना नहीं, और मुंबई के खर्चों के कारण पैसे पहले ही खर्च हो गए।

Web Title : 'Dhurandhar' actor clarifies he didn't receive ₹1 crore, money's gone.

Web Summary : Actor Vivek Sinha, facing trolling for his role in 'Dhurandhar 2,' denies receiving ₹1 crore. He clarified that while he received good payment, it wasn't that high, and due to Mumbai's expenses, the money is already spent.