'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 09:31 IST2025-12-22T09:31:02+5:302025-12-22T09:31:28+5:30
'धुरंधर'मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाची वर्णी लागणार होती. मात्र दिग्दर्शक आदित्य धरने तमन्नाला सिनेमात घेण्यास स्पष्ट नकार दिला.

'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
'धुरंधर' सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. या सिनेमातील गाणी आणि काही सीन्स प्रचंड व्हायरल झाले आहेत. 'धुरंधर'मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाची वर्णी लागणार होती. मात्र दिग्दर्शक आदित्य धरने तमन्नाला सिनेमात घेण्यास स्पष्ट नकार दिला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'धुरंधर'मधील शरारत गाण्याचे कोरिओग्राफर विजय गांगुलीने याबाबत खुलासा केला आहे.
'धुरंधर'मधील इतर गाण्यांप्रमाणे 'शरारत' या गाण्यालाही पसंती मिळत आहे. या गाण्यात आयशा खान आणि क्रिस्टल डिसूजा यांनी त्यांचा जलवा दाखवला आहे. पण, 'शरारत' गाण्यासाठी पहिली पसंती ही साऊथ स्टार तमन्ना भाटियाला होती. कोरिओग्राफर विजय गांगुलीने 'शरारत' गाण्यासाठी तमन्नाचं नाव सुचवलं होतं. पण, आदित्यने अभिनेत्रीला घेण्यास नकार दिला. फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत विजय गांगुलीने सांगितलं की "या गाण्यासाठी माझ्या मनात तमन्ना होती. मी तिचं नावही आदित्य सरांना सुचवलं होतं. मात्र त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की मला सिनेमात आयटम साँग नकोय.
"जर गाणं एकाच मुलीवर चित्रित झालं असतं तर कथेवरुन लोकांचं दुर्लक्ष झालं असतं. म्हणून गाण्यात एक नव्हे तर दोन जणी डान्स करताना दिसतात. एकाच व्यक्तीवर फोकस होईल असं आदित्य सरांना नको होतं. जर तमन्ना असती तर सगळ्यांचं लक्ष तिच्यावरच गेलं असतं. सिनेमात आधीच खूप गोष्टी घडत होत्या आणि जर कथेवरुन लक्ष दुसरीकडे गेलं असतं तर मग ते गाणं एक टाइमपास झालं असतं", असंही विजय गांगुलीने सांगितलं.
'धुरंधर' सिनेमा ५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होताच सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 'धुरंधर'मध्ये रणवीर सिंग, संजय दत्त, आर माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश कुमरा यांच्या मुख्य भूमिका आहेत.