Dhurandhar Box Office Day 10: 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! कमाईच्या बाबतीत केला मोठा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 10:57 IST2025-12-15T10:55:09+5:302025-12-15T10:57:10+5:30
'धुरंधर' सिनेमाने कमाईच्या बाबतीत केला मोठा विक्रम. दहाव्या दिवशी कमावले इतके कोटी. जाणून घ्या

Dhurandhar Box Office Day 10: 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! कमाईच्या बाबतीत केला मोठा विक्रम
अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दिग्दर्शक आदित्य धर यांचा स्पाय अॅक्शन चित्रपट 'धुरंधर' (Dhurandhar) बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. दमदार कथा, अॅक्शन आणि प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद यामुळे हा चित्रपट प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवून आहे. विशेष म्हणजे, 'धुरंधर'ने दुसऱ्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट बनण्याचा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
'धुरंधर'ने रिलीजच्या १० व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी मोठा विक्रम केला आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, या चित्रपटाने दुसऱ्या रविवारी तब्बल ५८ कोटी रुपयांची कमाई केली. या प्रचंड कमाईमुळे, 'धुरंधर'चे १० दिवसांचे भारतातील एकूण कलेक्शन आता ३५०.७५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
या विक्रमी कमाईसह, 'धुरंधर'ने रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'पद्मावत' चित्रपटाच्या भारतातले लाइफटाईम कलेक्शनला (३०२.१५ कोटी रुपये) मागे टाकले आहे. त्यामुळे आता 'धुरंधर' हा रणवीरच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे.
इतकंच नव्हे, तर 'धुरंधर'ने २०२५ या वर्षातील अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. 'धुरंधर' या चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडमध्ये एकूण १४३.५ कोटी रुपयांची कमाई करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या आकड्यामुळे, विकी कौशलच्या 'छावा' (१४०.७२ कोटी) आणि 'पुष्पा २' (हिंदी) (१२८ कोटी) सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकत, 'धुरंधर' दुसऱ्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट बनला आहे. आगामी काळात 'धुरंधर' किती कमाई करेल, याची सर्वांना उत्सुकता आहे.