Dhurandhar Box Office Collection: 'धुरंधर'ने केला धुरळा! रणवीर सिंगच्या सिनेमाने ८ दिवसात कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 11:30 IST2025-12-13T11:28:22+5:302025-12-13T11:30:24+5:30
धुरंधर सिनेमा रिलीज होऊन आता एक आठवड्यापेक्षाही अधिक काळ झाला आहे. त्यामुळे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे

Dhurandhar Box Office Collection: 'धुरंधर'ने केला धुरळा! रणवीर सिंगच्या सिनेमाने ८ दिवसात कमावले 'इतके' कोटी
आदित्य धर दिग्दर्शित अभिनेता रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. रिलीज होऊन अवघे आठ दिवस झाले असतानाच या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकण्याची तयारी केली आहे.
'सॅकनिल्क'च्या आकडेवारीनुसार, 'धुरंधर'ने भारतातील कलेक्शनमध्ये २३९ कोटींचा टप्पा गाठला आहे. रणवीर सिंगच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा' (२०१८) च्या लाईफटाईम कलेक्शनला 'धुरंधर' आता आव्हान देत आहे. 'सिम्बा'ने भारतात एकूण २४० कोटींचे कलेक्शन केले होते. 'धुरंधर' २३९ कोटींवर पोहोचला असल्याने, तो लवकरच 'सिम्बा'ला मागे टाकून रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल.
रणवीर सिंग वगळता, 'धुरंधर' हा चित्रपटातील बहुतांश कलाकारांसाठी करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त आणि आर. माधवन यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं, संगीताचं आणि गाण्यांचं चांगलंच कौतुक होत आहे. त्यामुळे 'धुरंधर' पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. आगामी दिवसात 'धुरंधर' सिनेमा आणखी किती कमाई करेल, याकडे सर्वांचं लक्ष आहे.