'धुरंधर' चित्रपटातील 'बडे साहब' कोण? ज्याच्या सांगण्यावरुन झाला २६/११ चा दशतवादी हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:18 IST2025-12-15T10:56:42+5:302025-12-15T11:18:07+5:30
'धुरंधर'च्या शेवटच्या दृश्यात हम्झा अली मझारीच्या हिटलिस्टमधील 'बडे साहब' हे नाव प्रेक्षकांसाठी मोठे गूढ ठरले आहे.

'धुरंधर' चित्रपटातील 'बडे साहब' कोण? ज्याच्या सांगण्यावरुन झाला २६/११ चा दशतवादी हल्ला
Dhurandhar Bade Sahab Identity : बहुचर्चित चित्रपट 'धुरंधर' सध्या बॉक्स ऑफिसवर आणि ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील रहमान डकैत, हमजा अली आणि जमीर जमाली यांसारख्या पात्रांनी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. मात्र, या सगळ्यामध्ये एका अदृश्य पण अत्यंत महत्त्वाच्या पात्राबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे, ते म्हणजे 'बडे साहेब'.
'धुरंधर'च्या कथानकात मेजर इक्बाल (अर्जुन रामपाल) याने अनेक वेळा 'बडे साहेब' याचा उल्लेख केला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना आता 'धुरंधर' मधील हे पात्र नेमकं कोण आहे, याबद्दल उत्सुकता लागली आहे. 'धुरंधर'च्या कथानकात 'बडे साहेब' या पात्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतात संसदेवरील हल्ला आणि २६/११ चे दहशतवादी हल्ले घडवण्यात आले, असे म्हटले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, 'बडे साहेब' हे पात्र अंडरवर्ल्डमधील सर्वात कुप्रसिद्ध नाव असलेल्या दाऊद इब्राहिमवर आधारित आहे. 'धुरंधर' चित्रपटाच्या पोस्ट-क्रेडिट सीनचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये थेट दाऊद इब्राहिमचा उल्लेख आहे, ज्यामुळे या भूमिकेबद्दलची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, 'धुरंधर २' मध्ये 'बडे साहेब' ही भूमिका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता दानिश इक्बाल साकारणार असल्याची चर्चा आहे. 'धुरंधर'च्या कथेत अजून अनेक ट्विस्ट आणि रहस्ये बाकी आहेत, जी सिक्वेलमध्ये उघड होतील.
'धुरंधर २' कधी प्रदर्शित होणार?
'धुरंधर'च्या प्रचंड यशानंतर प्रेक्षक 'धुरंधर २' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'धुरंधर २' च्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून, हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. प्रेक्षकांमध्ये सिक्वेलबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
