'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 08:47 IST2025-12-17T08:46:24+5:302025-12-17T08:47:35+5:30
धुरंधर सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा अक्षय खऱ्या आयुष्यात किती धार्मिक आहे याचा अनुभव नुकताच आला आहे. अक्षयने घरी केलेल्या वास्तुशांतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
अभिनेता अक्षय खन्नाची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर' (Dhurandhar) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चर्चेत आहे. चित्रपटातील सर्व कलाकार सोशल मीडियावर चाहत्यांसाठी प्रेम दर्शवत आहेत. 'धुरंधर'निमित्त सर्वात जास्त चर्चा झाली ती अक्षय खन्नाची. मात्र अक्षयने झगमगाटापासून दूर राहणे पसंत केले आहे. अशातच अक्षयचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात अक्षयने अलिबाग येथील आपल्या आलिशान बंगल्यात पूजा केली आहे.
'धुरंधर'च्या प्रचंड यशाच्या पार्श्वभूमीवर अक्षयने आपल्या अलिबागच्या बंगल्यात 'वास्तुशांती हवन' केले असल्याची माहिती समोर आली आहे. या पूजेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मोठ्या पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारा अक्षय खऱ्या आयुष्यात किती धार्मिक आहे, हे यावरुन स्पष्ट होतंय.
या विधीसाठी आलेले पुजारी शिवम म्हात्रे यांनी इन्स्टाग्रामवर अक्षय खन्नाचे पूजा करतानाचे फोटो शेअर केले आहेत. म्हात्रे यांनी मराठीत पोस्ट करत आपला अनुभव व्यक्त केला. ते म्हणाले, "अभिनेता अक्षय खन्ना यांच्या घरी विधीवत आणि भक्तिभावाने पूजन करण्याचा सौभाग्ययोग लाभला. शांत स्वभाव, साधेपणा आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असे व्यक्तिमत्त्व अनुभवायला मिळाले. " व्हायरल फोटो आणि व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेम दर्शवलं आहे
'धुरंधर' चित्रपटाची जबरदस्त यशस्वी घोडदौड
५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या स्पाय ॲक्शन थ्रिलरचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले असून, यात अक्षय खन्नाने साकारलेला 'रहमान डकैत' हा खलनायक विशेष गाजला आहे. विशेषतः या चित्रपटातील अक्षय खन्नाने 'fa9la' गाण्यावरजी डान्स स्टेप केली ती चाहत्यांमध्ये खूप ट्रेंड होत आहेत. अक्षय खन्ना आता पुढच्या वर्षी २०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'महाकाली' या चित्रपटातून पुन्हा पडद्यावर दिसणार आहे.