'धुरंधर २' मध्ये दिसलेला हमजा-यालिना यांचा 'तो' आलिशान बंगला कुठेय माहितीये? 'या' ठिकाणी झालंय शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:41 IST2026-03-23T16:40:31+5:302026-03-23T16:41:40+5:30
परदेशात नव्हे भारतातील 'या' ठिकाणी आहे 'धुरंधर २' मधील हमजा-यालिनाचा तो बंगला, तुम्हाला माहितीच नसेल

'धुरंधर २' मध्ये दिसलेला हमजा-यालिना यांचा 'तो' आलिशान बंगला कुठेय माहितीये? 'या' ठिकाणी झालंय शूटिंग
Dhurandhar 2: हिंदी सिनेसृष्टीत गेल्या काही महिन्यांपासून धुरंधर २ या सिनेमाची चर्चा सुरु आहे. अखेर १९ मार्चला हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा प्रदर्शित झाला. रणवीर सिंग आणि सारा अर्जुन यांच्या 'धुरंधर २' या चित्रपटाचं सगळीकडे कौतुक होत आहे. समीक्षकांसह प्रेक्षकांकडून देखील धुरंधर २ ला दाद मिळते आहे. रणवीरचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवीन विक्रम रचत आहे. दरम्यान, या चित्रपटाबरोबर त्यातील हमजा आणि यालिना यांचा आलिशान बंगला सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.हा आलिशान बंगला नेमका कुठे आहे... तुम्हाला माहितीये का?
'धुरंधर २' मध्ये रणवीर सिंग दुहेरी भूमिकेत पाहायला मिळतोय. जसकिरत आणि हमजा अशी त्याने साकारलेल्या पात्रांची नावं आहेत. पाकिस्तानाती गुप्तहेर रहमान डकैतच्या गॅंगमध्ये सामील होऊन तो स्वत ची एक वेगळी ओळख निर्माण करतो. त्यादरम्यान, त्याची आणि यालिनाची भेट होते आणि ते लग्न करतात. पण, चित्रपटात दाखवलेला हमजा आणि यालिनाचा बंगला कुठे आहे, हे फार कमी लोकांना माहीत असेल. सुरुवातीला हा चित्रपटाच्या सेटचा भाग असेल असा प्रेक्षकांचा समज होता. मात्र, तसं अजिबात नाही. हमजा आणि यालिना यांचा आलिशान बंगला पंजाबमधील अमृतसर येथे आहे. 'धुरंधर २' सिनेमाचं काही चित्रीकरणही तिथेच झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील अमृतसर येथील एक एकर प्लॉटवर हा आनंदा नावाचा बंगला स्थित आहे. या बंगल्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची वास्तुरचना. २०,००० चौरस फुटाचं क्षेत्र असलेल्या वास्तूचं आनंदा या नावाचं कनेक्शन भगवान बुद्ध यांच्याशी संबंधित असल्याचं म्हटलं जातंय .अमृतसरमधील या बंगल्यात प्रशस्त खोल्या, आलिशान फर्निचर्स, रोषणाई आणि सुरेख रचना आहे. इतकंच नाही, तर हा बंगला कोणत्याही राजवाड्यापेक्षा काही कमी नाही. धुरंधर २ मध्ये एक सीन आहे, ज्यात हमजा त्याची पत्नी यालिनाला एक सुंदर व्हिला भेट देतो.