करण देओल लग्नबंधनात अडकला, नातवाच्या वरातीत धर्मेंद्र यांचा भांगडा, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 13:18 IST2023-06-18T13:16:08+5:302023-06-18T13:18:17+5:30

नातवाच्या लग्नात उत्साहाने नाचतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

dharmendra does bhangra at his grandson karan deol wedding day video viral | करण देओल लग्नबंधनात अडकला, नातवाच्या वरातीत धर्मेंद्र यांचा भांगडा, Video व्हायरल

करण देओल लग्नबंधनात अडकला, नातवाच्या वरातीत धर्मेंद्र यांचा भांगडा, Video व्हायरल

अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओल (Karan Deol) आज लग्नबंधनात अडकणार आहे. द्रिशा आचार्य सोबत तो साताजन्माच्या गाठी बांधणार आहे. करण देओलची वरात निघाली असून यावेळी वरातीत करणचे आजोबा आणि अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी लक्ष वेधून घेतले. नातवाच्या लग्नात उत्साहाने नाचतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर सनी देओल, बॉबी देओलही बारातीत सामील होऊन मंडपाकडे रवाना झाले आहेत. करण देओल पगडी बांधून घोड्यावर चढला आहे.

बांद्रा येथील कडेश्वरी देवीचे आशिर्वाद घेऊन सनी देओलच्या लेकाची वरात निघाली आहे. गुलाबी शेरवानीमध्ये नवरा मुलगा खूपच हँडसम दिसतोय. देओल कुटुंबासाठी आजचा दिवस खूपच खास आहे.सनी देओल आणि बॉबी देओलने पापाराझींना पोज दिली आणि ते लग्नस्थळी रवाना झाले. तर 87 वर्षीय धर्मेंद्र यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. याही वयात त्यांचा उत्साह काही कमी नाही. लग्नस्थळी जाताना कॅमेऱ्यासमोर त्यांनी थोडा डान्स करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

कोण आहे द्रिशा आचार्य?

सनी देओलची होणारी सून द्रिशा आचार्य फिल्म निर्माते बिमल रॉय यांची नात आहे. तिचे आईवडील सुमित आचार्य आणि चिमू आचार्य दुबईत असतात. द्रिशा आपल्या आईसोबत 1998 मध्ये मुंबईत शिफ्ट झाली. ती मिडल ईस्टमध्ये एक टॉप इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवते. आईसोबत ती नॅशनल प्रोग्रॅम मॅनेजर म्हणूनही काम करते.

Web Title: dharmendra does bhangra at his grandson karan deol wedding day video viral