प्रेम असावं तर असं! हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र यांनी बुक केलेलं १०० खोल्यांचं रुग्णालय, नेमकं काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:42 IST2025-11-25T11:32:07+5:302025-11-25T11:42:31+5:30
लेक ईशाच्या जन्मावेळी धर्मेंद्र यांनी केली होती खास तयारी! हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र यांनी बुक केलेलं १०० खोल्यांचं रुग्णालय

प्रेम असावं तर असं! हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र यांनी बुक केलेलं १०० खोल्यांचं रुग्णालय, नेमकं काय घडलेलं?
Dharmendra: बॉलिवूडचे ही-मॅन ही उपाधी लाभलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं काल निधन झालं. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जगभरात चाहतावर्ग आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या करिअरची सुरुवात दिल भी तेरा हम भी तेरे सिनेमातून केली. त्यानंतर ते शोले, चुपके-चुपरे, सत्यकाम, अनुपमा तसेच सीता और गीता यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. धर्मेंद्र हे त्यांच्या अभिनयासह लव्ह-लाईफमुळेही तितकेच चर्चेत राहिले.
पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता त्यांनी १९८० मध्ये हेमा मालिनींसोबत लग्न केलं. हेमा आणि धर्मेंद्र यांना ईशा-अहाना या दोन मुली आहेत. हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांचं लव्ह मॅरेज असून त्यांची प्रेमकथा साऱ्यांनाच ठावूक आहे. पण, तुम्हाला माहितीये का प्रेमाखातर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी गरोदर असताना ईशा व अहाना या मुलींच्या जन्मापूर्वी संपूर्ण हॉस्पिटलच बुक केलं होतं. त्या हॉस्पिटलमध्ये जवळपास १०० खोल्या होत्या. रुग्णालयात चाहत्यांचा त्रास होऊ नये साठी धर्मेंद्र यांनी ही शक्कल लढविली होती.जीना इसी का नाम है या शोमध्ये खुद्द हेमा मालिनींनी केला होता.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की, त्यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर आणि चार मुले असतानाही दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला.